रोहा देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भाजपमध्ये दाखल रोहा, धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवकान्हे येथील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या वेळी महाविकासआघाडी सरकारचा खरपूस समाचार घेताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्ताधारी नेते केवळ भ्रष्टाचाराचे धडे गिरवतात, असा घणाघात केला. यासोबतच केंद्र …
Read More »Monthly Archives: May 2022
पनवेलमध्ये आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरामध्ये 10 फेब्रुवारी 2022 पासून जलकुंभ निहाय आठवड्यातून एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, परंतु सद्यस्थितीत देहरंग धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे गुरुवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शनिवार (दि. 28)पासून …
Read More »बोरघाटात बर्निंग कारचा थरार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सायमाळच्या वरच्या बाजूस शुक्रवारी (दि. 27) दुपारी निसान टेरानो या कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी कारमध्ये सात प्रवासी होते. त्यात बहुतांश महिलाच होत्या, त्यातील आजीबाईंना तातडीने बाहेर काढण्यात आल्यानंतर सर्व प्रवासी सुखरूप होते. पण, डोळ्यादेखत कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्याचबरोबर महामार्गाला लागून असलेल्या …
Read More »संभाव्य दरडग्रस्त वाड्यांची खालापूर तहसीलदारांकडून पाहणी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त भागाची पाहणी करून खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी तलाठी आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या. आगामी पावसाळ्यातील आपत्तीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांच्या यादीमधील बोरगांव ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी (बोरगाव खुर्द) आणि पोखरवाडी बंधारा येथे खालापूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक …
Read More »पाली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यात प्रशासनाला अपयश
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. शहरात येणार्या लक्झरी बसेस, डंपर, मोठे ट्रक यामुळे होणार्या वाहतूक कोंडीचा सामना सर्व नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील लव्हाटे चौक ते अथर्व हॉटेलपर्यंत लक्झरी बसेस, डंपर यांच्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. पाली हे अष्टविनायकांपैकी …
Read More »पेणमध्ये भोगावती नदी संवर्धन महोत्सव
पेण : प्रतिनिधी नदीविषय आपली नदी ही संकल्पना मनात रुजली पाहिजे. जोपर्यंत सर्वांची नदी ही संकल्पना आहे, तोपर्यंत नदीचे प्रदूषण होतच राहील. नदीचे प्रदूषण टाळायचे असेल तर एक दिवसाचे काम करून भागणार नाही, तर सतत वर्षानुवर्षे काम करावे लागेल, असे प्रतिपादन जल जैविक शेती संरक्षक डॉ. आदित्य धोपटकर यांनी पेण …
Read More »पोलादपुमध्ये वीजवाहिनी तुटून रस्त्यावर
पोलादपूर : प्रतिनिधी शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्टसर्किट झाल्यानंतर भैरवनाथनगरात जीवंत वीजवाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याची घटना सलग दोन घडल्यामुळे पोलादपूर महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे या शिर्षकाखाली पोलादपूर तालुक्यात रोज बारा बारा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. दरम्यान, शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील वीज …
Read More »खोरा बंदरातील वाहनतळ विनावापर
पर्यटकांची गैरसोय, मेरीटाइम बोर्डाचे लाखो रुपयांचे नुकसान मुरूड : प्रतिनिधी ऐतिहासीक जंजिरा किल्ल्याला भेट देणार्या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने अडीच कोटी रुपये खर्च करून खोरा बंदरात संरक्षक भिंत व वाहनतळ बांधले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे वाहनतळ वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे शिवाय मेरीटाइम …
Read More »राज्य सरकारने इंधन कर आणखी कमी करावा
भाजपचे रोहा तहसीलदारांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी राज्य सरकारने इंधानावरील कर आणखी कमी करावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. 26) रोहा भाजपच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. तर रोहा शहरातील राम मारुती चौकात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही …
Read More »रायगड जिल्ह्यातील गणवेश वाटपात घोळ?
महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जातात. सदरचे गणवेश शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्थरावरून अनुदान दिले जात असते. मात्र रायगड जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. रायगड़ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गणवेश वाटप संदर्भातील चौकशी पूर्ण झाल्याशिवाय …
Read More »