Breaking News

Monthly Archives: June 2022

मुरूडमध्ये विजेचा लपंडाव सुरू; शिवसेनेकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा

मुरूड : प्रतिनिधी सध्या मुरूड शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पर्यटकांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणविरोधात जनांदोलन करण्याचा इशारा शिवसेनेेने दिला आहे. मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे हजारो पर्यटक येत असतात परंतु वारंवार वीज घालवल्यामुळे पर्यटकांना …

Read More »

टाटा स्टीलच्या खोपोली प्लांटमध्ये स्वदेशी रोपांची लागवड

वर्षभरात 12 हजार रोपे लावली जाणार   खालापूर : रामप्रहर वृत्त जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टाटा स्टील कंपनीने आपल्या सावरोली (ता. खालापूर) प्लांट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली. ओन्ली वन अर्थ अर्थात आपल्याकडे एकच पृथ्वी आहे या यंदाच्या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या विषयाला अनुसरून आपल्या वसुंधरेचे रक्षण करून, तिला जास्तीत …

Read More »

मोरे महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन

पोलादपूर : प्रतिनिधी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या चोळई येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन सोमवारी (दि. 6)उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते महाविद्यालयापर्यंत शिवज्योत …

Read More »

पोलादपूरमध्ये वृक्षारोपण : भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर यांचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलादपूर नगरपंचायतीच्या भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर-निकम यांच्यावतीने रविवारी (दि. 5) वार्ड क्रमांक 14 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक भान राखून विविध उपक्रम राबविण्याचे काम करून आपण जनतेच्या सोयी-सुविधांसाठीही लढणार असल्याचे या वेळी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांनी सांगितले. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावून …

Read More »

द्रुतगती मार्गावर बोरघाटात एसटी व ट्रकचा अपघात; जखमी प्रवाशांवर उपचार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी द्रुतगती मार्गावरील बोरघाटातप्रवाशी एसटी बस व मालवाहतूक ट्रक यांच्यामध्ये सोमवारी (दि. 6) दुपारी अपघात झाला. यात बसमधील एकूण नऊ प्रवाशी जखमी झाले. त्यांच्यावर खोपोली व पवना येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. फलटण स्वारगेट मार्गे बोरिवली ही राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच-14,बीटी-4436) सोमवारी दुपारी बोरघाटातून द्रुतगती मार्गावरून …

Read More »

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप कार्यालयात रविवारी (दि. 6) उत्तर रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मंडल पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रत्येक मंडलात कार्यक्रम करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आणि …

Read More »

रायगडात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा

म्हसळा वाचनालयात शिवपुतळ्याचे पूजन म्हसळा ः प्रतिनिधी शिवस्वराज्य दिना निमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात सोमवारी (दि. 6) 349वा शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील, वाचनालयाचे सचिव अशोक काते, संचालक …

Read More »

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा; जिल्हा परिषद येथे भगव्या ध्वजाची गुढी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती. ग्रामपंचायत विभाग कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गीतगायन करण्यात आले. जिल्हा …

Read More »

रायगड संघाचा नंदुरबार संघावर दणदणीत विजय

नैतिक सोळंकीचे सामन्यात 13 बळी; स्मित पाटीलच्या आक्रमक 111 धावा पनवेल : वार्ताहर   महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू असलेल्या, 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगड संघाने नंदुरबार संघावर एक डाव आणि 194 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. नाणेफेक जिंकून नंदुरबार संघाने फलंदाजी स्वीकारली, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 56 …

Read More »

माथेरानमध्ये ई-वाहनांची चाचणी घेण्याचे पालिकेला आदेश

कर्जत : बातमीदार माथेरान सनियंत्रण समितीने परवानगी दिल्यानंतर सर्वोच्य न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडून ई-रिक्षाची चाचणी घेईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने माथेरान पालिकेला पत्र पाठवून ई रिक्षाची चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. ई-वाहनांची चाचणी घेण्यात येणार असल्याने माथेरानकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना …

Read More »