Breaking News

Yearly Archives: 2022

नवी मुंबईत मोबाइल चोरांचे त्रिकूट अटकेत

एक लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जाणार्‍याच्या हातातली मोबाइल हिसकावून पळ काढणार्‍या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकाला यश आले आहे. या मोबाईल चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केली आहे. या तीन आरोपीकडून एक लाख 33 हजाराचा …

Read More »

मुरूडमध्ये ‘आत्मा’ तर्फे रानभाजी महोत्सव

मुरूड : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत पंचायत समिती सभागृहात मंगळवारी (दि. 9) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात कृषी मंडळ अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी रानभाज्यांचे महत्त्व विषद केले. तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ, …

Read More »

मुरूडजवळ समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरातमधील मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. गुजरातच्या वेरावळ बंदरातील एक बोट मंगळवारी सायंकाळी मासळी पकडत पंखा तुटल्याने पद्मदुर्ग परिसरात अडकून पडली होती. बोटीच्या तांडेलने नांगर टाकून ती एका जागी थांबवून ठेवली …

Read More »

अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत ः बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणेदोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1,435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला …

Read More »

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खोपोलीत भाजप युवा मोर्चातर्फे बाईक रॅली

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चा खोपोली शाखेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत बुधवारी (दि. 10) शहराच्या शिळफाटा ते खोपोली गाव अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिळफाटा येथील पूर्णाकृती पुतळ्यास युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बाईक रॅलीस …

Read More »

एडका पॉईंटचे सातत्याने बांधकाम अन् पडझडही

पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र. 42 या रस्त्याच्या रूंदीकरणादरम्यान डोंगर कापण्यात आल्याने सुटलेला मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतुकीसाठी आंबेनळी घाट बंद ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या नव्याने मोरीचे बांधकाम करून तेथे तयार झालेल्या एडका पॉईंट धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर अशी मोरी बांधली असली तरी अद्याप …

Read More »

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट रक्कम मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांत राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पनवेलमध्ये भाजप युवा मोर्चाची बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

गव्हाण विद्यालयात राख्यांचे प्रदर्शन

चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त बहीण-भावाच्या पवित्र नात्याची ओळख असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांच्या प्रदर्शनाचे बुधवारी (दि. 10) भरविण्यात आले होते. या …

Read More »

अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल कर्जत : बातमीदार नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणे दोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. नेरळमधील वेदांत हा वडिलांसोबत स्थानिक परिसरातील …

Read More »