Breaking News

Yearly Archives: 2022

स्त्री सक्षमीकरण काळाची गरज

स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत, पण दैनंदिन आयुष्यात या विषयाचा कुणी सहसा वेगळा असा विचार करत नाही. या व्याख्यांचे विविध पैलू आहेत आणि ते आपल्या जगण्या वागण्यात मिसळून गेलेत या अनुषंगाने पाहायला गेलं तर असे लक्षात येईल की लहानपणापासून मनावर बिंबवल्या गेलेल्या किंवा सभोवतालच्या वातावरणातून आपण …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 17 मार्चला दास्तान फाट्यावर रास्ता रोको

सर्वपक्षीय कृती समितीची सिडकोविरोधात घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिडकोच्या 52व्या वर्धापन दिनी म्हणजेच येत्या 17 मार्चला उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथे रास्ता रोको करून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या आयोजनासंदर्भात आगरी समाज मंडळाच्या सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ …

Read More »

मोदी सरकारची प्रकल्पपूर्ती

सलग दुसर्‍यांदा बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार मिळालेल्या संधीचे सोने करीत आहे. ज्या जनतेने आपल्याला भरभरून कौल दिला त्या सर्व घटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवून त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. पुण्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन त्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्राची …

Read More »

अलिबागमध्ये तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण; पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी चूल आणि मूल या मानसिकतेतून बाहेर पडून महिलांनी आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ही ओळख त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा कर्तृत्ववान महिला इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस …

Read More »

तोतया व्यक्ती उभा करून  माणगावमध्ये जमिनीची विक्री; नऊ आरोपींवर गुन्हा दाखल

माणगाव : प्रतिनिधी मयत इसमाच्या जागी तोतया इसम उभा करून तसेच त्याचे बनावट पॅनकार्ड तयार करून संगनमताने साखळेवाडी (ता. माणगाव) येथील जमिनीची विक्री करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड येथील उल्हास टुमणे यांचे काका अरविंद विश्वनाथ टुमणे व उल्हास शंकर टुमणे …

Read More »

भारताने करून दाखवले

युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्पुरत्या का होईना युद्धविरामाची घोषणा रशियाने केली. निश्चितपणे भारताने सातत्याने यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याचे योगदान यामागे आहे. ऑपरेशन गंगा आणखी काही दिवस सुरूच राहील. परंतु अन्य देशांना जे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे. …

Read More »

उल्हास नदी संवर्धनांचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही तर नद्यांमधील जीव यांचे आयुष्य देखील प्रदूषित पाण्यात असलेल्या सर्वांचे कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हासनदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदी मध्ये होतो. ही नदी …

Read More »

आयसीसी महिला वर्ल्डकप 2022; भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था आयसीसी महिला वर्ल्डकप 2022च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने प्रथमच पराभव …

Read More »

खारघर येथे महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त 5 ते 9 मार्च दरम्यान सेक्टर 12, गावदेवी मैदानावर महिला बचतगट वैयक्तिक महिला उद्योजिकांच्या माध्यमातून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी …

Read More »

भाजपचे कार्य वंचित घटकांपर्यंत पोहचवा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्‍यांना आवाहन भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र पनवेल ः वार्ताहर उत्तर रायगडमधील भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना भारतीय जनता पक्षाचे कार्य प्रत्येक वंचित घटकांपपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपा भटके-विमुक्त …

Read More »