Breaking News

Yearly Archives: 2023

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. 17) याबाबतचा निर्णय दिला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण …

Read More »

आग्रा किल्ल्यात यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस यांनी केले मोदी सरकारचे अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत केंद्रातील मोदी सरकारचे …

Read More »

वृक्षांची कत्तल आणी वणव्यामुळे दुर्मिळ पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात

खोपोली : प्रतिनिधी वृक्षांच्या बेसुमार तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्याचबरोबर पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या वृक्षांवर आपण घाव घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पक्ष्यांचे अधिनिवास नष्ट होत चालले आहेत. पूर्वी जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असायचे त्याचबरोबर पक्ष्यांचे मंजुळ स्वरही कानी पडत असत. मात्र मानवानी स्वताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  वृक्षांच्या मुळावर घाव …

Read More »

‘सीकेटी’मध्ये रंगला अंतरंग कार्यक्रम

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर  (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे 13 आणि 14 फेब्रुवारीदरम्यान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत आणि जिमखाना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी अंतरंग 2022-23 …

Read More »

पनवेलमध्ये शिवजयंतीनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 19च्या वतीने रविवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रेनिमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 वर्षांखालील मुलामुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ (8767149203) किंवा रोहित जगताप (8691930709) …

Read More »

खोपटा येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

उरण : प्रतिनिधी खोपटा खाडी पुलाजवळील रिलायन्स कंपाऊंडमधील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी घडली आहे. अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळाले आहे, मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी नोड परिसरातील खोपटा पुलाजवळील रिलायन्स …

Read More »

पलावा परिसरातील लोकांना मिळणार आता उत्तम दर्जाची आरोग्य सेवा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पलावा हे कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे महानगर प्रदेशातील एक वाढणारे शहर आहे आणि अपोलो हॉस्पिटल्सकडून मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड तेथील लोकांसाठी आरोग्यसेवेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे निश्चितच परिसरातील लोकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे. अपोलो क्लिनिक नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. किरण शिंगोटे, …

Read More »

आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे ऐरोली विभागासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर

राज्य सरकारमार्फत नागरी सुविधा होणार उपलब्ध नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्राचा सर्व समावेशक आणि समतोल विकास होत असताना नाईक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून ऐरोली विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, दळणवळण, स्कायवॉक, …

Read More »

पनवेल पालिकेचा पाणीपुरवठा आणि मल:निसारणाचा प्रश्न मार्गी

तब्बल 355 कोटी 74 लाख रुपयांना मान्यता; पनवेलची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेला मलनिःसारण व पाणी पुरवठा प्रकल्पाकरिता तब्बल 355 कोटी 74 लाख रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या अनुषंगाने …

Read More »

सायन-पनवेल महामार्गावर बसला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप पनवेल : वार्ताहर सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथील कोपरा पुलाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून प्रवाशांना वाहनाबाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन विभागाने बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. ही बस मुंबईवरून सातार्‍यातील सांगोलाकडे जात …

Read More »