दुसरी लाट शिखर गाठण्याआधीच तिसर्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसरी लाट कधीही येऊ शकते असा इशारा अधिकृतरित्या दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी आणि कशी येईल, तिचा जोर कितपत असेल याचा अंदाज मात्र तज्ज्ञांनाही अजुन आलेला नाही. तथापि, …
Read More »हिल स्टेशन कुडपणच्या पर्यटन विकासाचे स्वप्न
पोलादपूर तालुक्यातील अतिदूर्गम भागामधील कुडपण या गावाच्या नकाशावर ब्रिटीशांनी हिलस्टेशन असा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. राज्यातील एकमेव महावीरचक्र प्राप्त महायोध्दा नाईक कृष्णा सोनावणे यांचे हे मूळगांव आहे. मिनी महाबळेश्वर अथवा थंड हवेचे ठिकाण असो अथवा इको सेन्सेटिव्ह झोनमधील जैवविधता संरक्षणाचा जुन्या वनौषधी वनस्पतींचा अस्पर्शी जंगलपरिसर असो कुडपणची ओळख पर्यटनस्थळ म्हणून …
Read More »होत्याचे नव्हते झाले…
मराठा आरक्षणाबाबत राजकारण करायचे नाही असे भाजपने ठरवले होते, परंतु महाविकास आघाडीचे नेते मात्र राजकारणाशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या लढाईत फडणवीस यांची मदत घेतली असती तर आज चित्र कदाचित वेगळे दिसले असते, परंतु विरोधीपक्षाचे साह्य घेण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला कमीपणा वाटतो हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. …
Read More »क्रिकेटप्रेमींचा हिरमोड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचे आता कुठे सुचले यावर टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. वास्तविक यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. हा एक व्यावहारिक निर्णय आहे. क्रिकेटपटूंची सुरक्षितता आणि आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आयपीएल स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयपीएल नियोजन समितीच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »पराभवाचा सोहळा
पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. …
Read More »मिशन लसीकरण
महाराष्ट्रासह देशातील कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचे आहे. 18 वर्षांवरील सर्व देशवासीयांचे आता लसीकरण होणार असून, इतर देशांकडून लसी येणे सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा देशाला जबरदस्त तडाखा बसला आहे. …
Read More »कोरोना महामारी आणि मानवी जीवन
मानवी जीवन किती अनमोल अन् क्षणभंगूर आहे या दोन्हीचा प्रत्यय सध्या एकाच वेळी येतोय. वैश्विक महामारी कोरोनाचे थैमान सलग दुसर्या वर्षी सुरूच आहे, किंबहुना दुसर्या लाटेत धोका अधिक वाढल्याचे दिसून येते. कोविड-19 विषाणूमुळे लोक अक्षरश: किड्या-मुंगीप्रमाणे मरताहेत. परिणामी सर्वत्र भीतीयुक्त आणि नैराश्यपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे. असे म्हणतात की कितीही …
Read More »फायदा झाला तर वेतन अधिक, नाही झाला तर वेतन कमी!
म्युच्युअल फंड उद्योगातील उच्च अधिकारी घेत असलेले गलेलठ्ठ वेतन आणि ते गुंतवणूकदारांना देत असलेला परतावा यात असणारी तफावत सेबीने केलेल्या नव्या बदलामुळे कमी होणार आहे. कारण असे अधिकारी ज्या योजनेचे काम करतात, त्याच्या फायद्या-तोट्यात त्यांनाही आता नियमाने वाटेकरी करून घेण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना सावध करणे आणि त्याचबरोबर नव्या बदलांची माहिती …
Read More »संकटाचा मुकाबला करण्यासाठी हवे शांत आणि स्थिर मन
कोरोना संकट लांबल्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक अडचणीसोबत आता मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. तो टाळण्यासाठी संभ्रम वाढविणार्या गोष्टींपासून दूर राहणे, दैनंदिन जीवनात दुराग्रह टाळणे, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या आयुष्याला सामोरे जाणे अशा काही अंगाने आता नवा विचार करण्याची गरज आहे. कोरोना साथीत आणि साथीनंतर माणसाच्या अर्थकारणावर आणि शारीरिक स्थितीवर …
Read More »महाराष्ट्र दिनाचा सांगावा
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यानंतरच्या 61 वर्षांमध्ये महाराष्ट्राने अनेक भल्याबुर्या घटना पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. या 61 वर्षांच्या काळात महाराष्ट्र अक्षरश: घडला आणि हा मराठी माणसांचा प्रदेश घडवण्याच्या कामात अनेक दिग्गजांचा हातभार लागला. महाराष्ट्राची ही एकसष्टी एरव्ही अत्यंत थाटामाटात साजरी झाली असती. घरोघरी गुढ्या-तोरणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper