निलेश राणेंची शिवसेनेवर टीका कणकवली : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी …
Read More »संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना …
Read More »‘पीबीएल’मधून सायनाची माघार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने गेल्या पीबीएलमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्या आगामी हंगामात ती खेळणार …
Read More »अयोध्येप्रकरणी शांती, एकतेचे दर्शन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जनतेने शांती व एकतेचे दर्शन घडवले, असे म्हणत मोदींनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 59वा भाग रविवारी (दि. 24) प्रसारित झाला. या …
Read More »‘इफ्फी’मध्ये घोडचूक
सत्यजीत रे यांच्याऐवजी दुसर्याचा फोटो पणजी : वृत्तसंस्था सध्याच्या घडीला गोव्यात सुरू असणार्या 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इफ्फीच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज …
Read More »नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …
Read More »फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील
नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …
Read More »ही तर संधीसाधू आघाडी!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी …
Read More »रस्त्यांवर नोटांचा पाऊस
कोलकाता : कोलकातातील एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर या इमारतीतून 2000, 500 आणि 100च्या नोटांचे बंडल खाली रस्त्यांवर फेकण्यात आले. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्यांची झुंबड उडाली होती. कोलकातातील एमके पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. …
Read More »अयोध्येत गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू
अमित शहा यांची घोषणा रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper