यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर यवतमाळ : प्रतिनिधी यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचे बोलले जात आहे. …
Read More »गांधीनगर मनपा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय
गांधीनगर ः गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर काँग्रेस व आम आदमी पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपने 44 पैकी 41 जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आपला फक्त एका जागेवरच …
Read More »केंद्राने एक लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवले; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
लखनऊ ः वृत्तसंस्था तब्बल 4737 कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये 75 प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने न्यू अर्बन इंडिया थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला …
Read More »आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरू आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आज एका अशा मिशनची …
Read More »अजितदादा, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल!; शिवसेना नेते संजय राऊतांचा इशारा
पुणे ः प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये वारंवार विसंवाद दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय रविवारी (दि. 26) पुन्हा एकदा आला. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून अजितदादा, आमचे ऐका, नाहीतर गडबड होईल, …
Read More »अमेरिका दौर्याहून परतलेल्या पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत
नवी दिल्ली ः अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. 26) सकाळी भारतात परतले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतरांनी दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जयजयकाराच्या घोषणा दिल्या, तर पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौर्यात सलग अनेक बैठका घेतल्या. ते …
Read More »ट्रकचालकांच्या डुलकीवर सेन्सर्सचा उपाय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अभिनव प्रयोग नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रकचालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक …
Read More »‘देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर एका पक्षाला ताप’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.पंतप्रधानांनी शुक्रवारची देशाची लसीकरणाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. …
Read More »आयपीएलच्या दुसर्या सत्राला रविवारीपासून सुरुवात
दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रविवारी (दि. 19) रंगणार आहे. या टीम्सचा या आयपीएलमधील हा 30वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी
रतलाम : वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper