Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही -‘डब्ल्यूएचओ’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाअनेक देशांमध्ये कोरोना लशींवर काम सुरू आहे. काही ठिकाणी लशी तिसर्‍या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) महासभेत त्यांनी हे वक्तव्य केले.घेब्रेयेसस पुढे म्हणाले …

Read More »

हैदराबादमध्ये भाजपची मुसंडी

अवघ्या चारवरून तब्बल 48 जागांवर झेप हैदराबाद : वृत्तसंस्थाग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत 48 जागा जिंकल्या आहेत. तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस)ने सर्वाधिक 55 आणि एमआयएमने 44 जागी विजय मिळविला, तर काँग्रेसला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.एका वॉर्डच्या मतमोजणीला उच्च न्यायालयाने स्थगिती …

Read More »

शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचा झेंडा

शिर्डी : प्रतिनिधी शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे. केवळ तीन नगरसेवक असतानाही भाजपला नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जगन्नाथ गोंदकर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले. शिर्डी नगरपंचायतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. नगरपंचायतीत एकूण 17 पैकी …

Read More »

वैज्ञानिकांकडून ग्रीन सिग्नल मिळताच लसीकरण : पंतप्रधान

सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या बैठकीत माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीबाबत शुक्रवारी (दि. 4)  सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. पुढील काही आठवड्यांत कोरोना प्रतिबंधक लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील देताच भारतात लसीकरण सुरू होईल, असे पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सांगितले. लसीचा साठा व रिअल टाइम इन्फर्मेशनसाठी खास सॉफ्टवेअर …

Read More »

‘देशात डिसेंबरअखेर कोरोना लशीला मान्यता मिळेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटाशी सामना करणार्‍या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरू आहे. यापैकी दोन लशींचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू असल्याचेही त्यांनी …

Read More »

टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वन डेत विजय कॅनबेरा : कर्णधार विराट कोहलीसह अष्टपैलू हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांची अर्धशतके आणि शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. अंतिम सामन्यात 13 धावांनी विजय साकारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. ऑस्ट्रेलियाकडून …

Read More »

तिघे एकत्र या, नाही तर चौघे या…आम्ही एकटे पुरेसे आहोत!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कडाडले सांगली : प्रतिनिधी तुम्ही तिघे एकत्र या, नाही तर चौघे या. आम्ही एकटे पुरेसे आहोत, अशी गर्जना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तसेच जगात कोणावरही बोललो तरी मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर टीका का करतात हे कोडे सध्या माध्यमांनाही पडले आहे, असा टोलाही पाटील …

Read More »

‘कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांची दिशाभूल केली जातेय’

वाराणसी : कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत, मात्र काही जण शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवत आहेत. ज्यांनी शेतकर्‍यांचा छळ केला, तेच आता शेतकर्‍यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 30) येथे अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, सरकारे कायदे तयार …

Read More »

मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. …

Read More »

मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला

उदयनराजेंचे टीकास्त्र सातारा : प्रतिनिधी आधीच्या पिढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास …

Read More »