नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कडक संचारबंदीनंतर पनवेलसह नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, मात्र कोरोना मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिवसाला सरासरी आठ ते नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. नवी मुंबई शहरात 50 वर्षांवरील बाधितांचे मृत्यू अधिक असून शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1350च्या …
Read More »ठाकरे सरकार युवाविरोधी
भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे, मात्र ठाकरे सरकारने 1 मेपासून कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे सर्वांचे लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा …
Read More »राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक बाळकृष्ण विष्णु ऊर्फ प्रमोद कोनकर यांच्यासह विविध विभागातील दहा पत्रकारांना दर्पण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्या 28व्या सन 2020च्या …
Read More »सिडकोकडून घरांचे हफ्ते भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19मधील घरांचे (सदनिकांचे) हफ्ते थकीत असणार्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत नवी मुंबईतील …
Read More »मुंब्र्यात रुग्णालयात आग; चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे ः प्रतिनिधीकोरोनाच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि. 28) पहाटे आगडोंब उसळला. यात …
Read More »राज्यात 18 ते 44 वयोगटासाठी 1 मेपासून लसीकरण नाही!
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले जाहीर मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र उत्साह संचारला होता. राज्यातील युवावर्गाने लसीकरणाची तयारीही केली होती, मात्र राज्यात या वर्गासाठी 1 मेपासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. …
Read More »राज्यात लॉकडाऊन वाढणार!
15 मेपर्यंत निर्बंध कायम राहण्याची शक्यता मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात वेगाने पसरणार्या कोरोनामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. याआधी 1 मेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, पण राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तो आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी …
Read More »मोफत लसीकरणावरून श्रेयवाद
महाविकास आघाडीतील काँग्रेसची उघड नाराजी मुंबई ः प्रतिनिधीकेंद्र सरकारने 1 मेपासून देशभरात 18 वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केले जाईल असे जाहीर केले असून, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकास आघाडी सरकारमधील नवाब मलिक यांनी …
Read More »कोरोना संकटात नाका कामगारांची होरपळ; नोंद नसल्याने शासकीय मदतीपासून वंचित
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश कामगारांनी गावचा रस्ता धरला, तर काही कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी करताना दिसत आहेत. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी नवी मुंबई परिसरात काम मिळत नसल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवी मुंबईत जवळपास तीन हजारांहून अधिक …
Read More »ठाकरे सरकारचा कोविड भ्रष्टाचार; किरीट सोमय्या यांची लोकायुक्त आणि एसीबीकडे तक्रार
मुंबई ः प्रतिनिधी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किमती आणि त्यावरून सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याचिका दाखल केली आहे. राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजनच्या कमरतेमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची दमछाक झाली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper