खासदार गिरीश बापटपोलिसांच्या ताब्यात पुणे : प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. पुण्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंटसह पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचेही जाहीर केले, मात्र भाजपने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू …
Read More »कोरोना आला तेव्हा सरकार ‘मातोश्री’त
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आज जितेंद्र आव्हाड …
Read More »सरकारच्या अपयशाचे जनतेवर खापर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टीका; मुख्यमंत्री ठाकरे यांना अभ्यास करण्याचा सल्ला मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाऊन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश हे मुख्यमंत्र्यांनी या वेळी ही राज्यातील …
Read More »मजुरांनी धरली गावची वाट
मुंबई, पुणे ः प्रतिनिधीराज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्या मजूर, कामगार, मजुरांनी आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. परिणामी हॉटेल, बांधकामसह अनेक क्षेत्रात कामगारांची कमतरता भासू लागल्याने नवा प्रश्न उभा राहिला आहे.मुंबई, पुणे अशा शहरांसह आजूबाजूच्या परिसरात परराज्यांतील काम …
Read More »पहिली ते आठवीची परीक्षा रद्द
राज्यातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 3) ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. …
Read More »राज्यपालांसोबत सामाजिक कार्यावर चर्चा
मुंबई : प्रतिनिधी अगरवाल समाज पनवेल व अखिल भारतीय सर्व वैश्य एकता महासभा महाराष्ट्रद्ारा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी (दि. 1) भेट घेण्यात आली. या वेळी राज्यपालांना होळीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली. या सदिच्छा भेटीवेळी अगरवाल समाज पनवेलचे अध्यक्ष तुषार अगरवाल, मंत्री अनिल बागरिया व कमलेश अगरवाल …
Read More »सिडकोच्या द्रोणागिरी, कळंबोली येथील कोविड समर्पित रुग्णालयांचे ई-लोकार्पण
नवी मुंबई, पनवेल : सिडको वृत्तसेवा, प्रतिनिधी पनवेल व उरण परिसरातील कोविडबाधित रुग्णांच्या उपचारासाठी सिडको महामंडळातर्फे कळंबोली सेक्टर-5ई आणि द्रोणागिरी सिडको प्रशिक्षण केंद्र येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कोविड समर्पित रुग्णालयांचे शुक्रवारी (दि. 2) राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन ई-लोकार्पण करण्यात आले. या वेळी कळंबोली येथील कोविड समर्पित केंद्राचे …
Read More »ठाकरे सरकारकडून फसवाफसवी!; भाजप नेते नारायण राणेंची टीका; लॉकडाऊनला विरोध
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत झालेली वाढ ही फक्त नियमांचे पालन न केल्याने झाली आहे असे लादून राज्य सरकार राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने लॉकडाऊनला विरोध दर्शवत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. लॉकडाउन करणे राज्याला आता पेलवणारे नाही. ठाकरे सरकार फसवाफसवीचे धंदे करत …
Read More »घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन कसे काय केले?
भाजपचा सवाल; खुलासा करण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. घरातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला, असा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार …
Read More »‘ती’ गाडी वाझेंच्या ड्रायव्हरने केली होती पार्क; एनआयएचा मोठा खुलासा
मुंबई ः प्रतिनिधी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठा खुलासा केला आहे. स्फोटके असलेली कार सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी चालकाने पार्क केली होती, असे एनआयए तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper