Breaking News

मुंबई – नवी मुंबई

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर हे सोमवारी (दि. 22) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.महाराष्ट्रात सध्या राजकारणातील आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे …

Read More »

देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण?

देवेंद्र फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत त्या वेळी देशमुख क्वारंटाइनमध्ये होते, असे पवारांनी सांगितले. …

Read More »

महामुंबई क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट; आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना साथीचा सामना करण्यासाठी गेल्या वर्षीपासून युद्धपातळीवर काम करणार्‍या नवी मुंबई, पनवेल, आणि उरण या महामुंबई क्षेत्रांतील स्थानिक प्रशासनाला काही दिवस उसंत मिळालेली असतानाच पुन्हा सुरू झालेल्या कोरोना लाटेशी दोन हात करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेेसमोर आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातच कोरोना रुग्णांची संख्या …

Read More »

सचिन वाझे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती

केंद्र सरकारने चौकशी करावी -राज ठाकरे मुंबई ः प्रतिनिधीदहशतवादी बॉम्ब ठेवतात अशा घटना आपण आजवर पाहत आलो, पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. …

Read More »

हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त …

Read More »

तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?

फडणवीसांचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 21) …

Read More »

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 20) जाहीर केले. त्यानुसार इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मेदरम्यान होणार आहे.राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, …

Read More »

गृहमंत्र्यांनी वाझेंना दरमहा 100 कोटींचे टार्गेट दिले होते

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप नुकतेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

एनएमएमटीची विशेष तिकीट तपासणी मोहीम; फुकट्या प्रवाशांना दंड

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई परिवहन सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासीदेखील प्रवास करीत आहेत. त्यावर प्रतिबंध म्हणून मनपा परिवहन उपक्रमाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार दररोज किमान 200 ते 300 प्रवासी फुकट प्रवास करताना आढळत असून त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई केली …

Read More »

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता मुंबई : प्रतिनिधी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरून पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी …

Read More »