Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई

तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार …

Read More »

‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.विद्यार्थी कोरोनाबाधित असेल किंवा विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी, …

Read More »

मुंबईत मॉलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधीभांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री 12.30च्या सुमारास ही आग लागली होती. आगीची झळ मॉलमधील सनराइज रुग्णालयाला बसली.ड्रीम मॉलमध्ये तिसर्‍या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20हून …

Read More »

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 9 एप्रिलला सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन गुरुवारी दाखल झाला.यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाट्यमयरित्या अगदी शेवटी नाव …

Read More »

फोटो स्टुडिओवाल्यांनाही कोरेानाचा फटका

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लग्नसमारंभ लांबणीवर जाऊ लागली आहेत. यात व्यावसायिक छायाचित्रकारांचे हाल होत आहेत. वर्षभर कॅमेरा पडूनच असल्याने अनेकांनी स्टुडिओ बंद करून जोडधंद्याचा आधार घेतला आहे. गतवर्षी कोरोनाने केलेला कहर दोन महिन्यांपूर्वी बहुतांशी कमी झाला होता. मात्र मागील महिन्यात पुन्हा …

Read More »

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीमध्ये?; यूपीए अध्यक्षपदावरून काँग्रेसची आगपाखड

मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद भूषवायला हवे, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. यावरून काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, असा गोंधळ …

Read More »

लूज बॉल सीमारेषेबाहेर पाठवणारच!; ठाकरे सरकारविरोधात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवर सध्या परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्‍यांवर अनेक आरोप केले असताना गुरुवारी (दि. 25) त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधार्‍यांवर निशाणा …

Read More »

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : आपल्या गायनाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रख्यात गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीची बैठक गुरुवारी (दि. 25) झाली. या बैठकीत भोसले यांना 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी …

Read More »

थोडे तरी स्वकर्तृत्व दाखवा!; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात वाझे आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील एका ज्वलंत अशा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत …

Read More »

राज्यपाल साहेब, महाराष्ट्र वाचवा!

भाजपच्या शिष्टमंडळाचे साकडे; राष्ट्रपतींकडे माहिती पाठविण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतायेत त्या चिंताजनक आहेत. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी त्यांना वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »