Breaking News

मुंबई – नवी मुंबई

उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिले नाराजीचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातीन जनतेची कोरोनासोबत निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतील महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होत आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक …

Read More »

झूम अॅपवर नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची सभा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळाची त्रैमासिक सभा आणि नवीन कार्यकारणी नियुक्ती सभा मंडळाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पनवेल येथे डिजिटल झूम अ‍ॅप ऑनलाइन सभासद, पदाधिकार्‍यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून घरीच झाली. शांताराम सोनार यांनी सभेचे प्रास्ताविक करत सभेचा हेतू स्पष्ट केला. तसेच …

Read More »

विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही -अॅड. आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी – 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी आठ लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 म्हणजे 40% विद्यार्थी नापास करणार? म्हणजे एक पिढी उध्वस्त करणार! सर्वज्ञानी राज्य सरकार ऐका! महाराष्ट्रातील या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. यासाठी संघर्ष …

Read More »

होम क्वारंटाइन व्यक्तींना ऑनलाइन सल्ला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य …

Read More »

नवी मुंबईत बळींची संख्या शंभरीपार

नवी मुंबई : बातमीदारकोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत …

Read More »

नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले

नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर  शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही.  वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …

Read More »

नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांनी केला मान्सूनपूर्व पाहणी दौरा

नवी मुंबई : बातमीदार – राज्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी अरेंजा कॉर्नर वाशी येथील मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा केला. अरेंजा कॉर्नर येथील नाल्याच्या कामाची पाहणी केली. धिम्यागतीने सुरू असलेली कामे तसेच अर्धवट अवस्थेतील ठेवण्यात आलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनास सूचित …

Read More »

रायगडसाठी 100 कोटींची मदत तोकडी ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधी …

Read More »

मुंबईत पुन्हा धावणार बेस्ट!

मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या हाहाकारानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बसेस सुरू होणार आहेत. रविवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावणार असून या बसेसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.राज्य तसेच केंद्र सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करीत …

Read More »