Breaking News

मुंबई – नवी मुंबई

जे नियम एमआयएमसाठी होते तेच राहुल गांधींच्या सभेसाठी असतील; परवानगीवरून गृहमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई ः प्रतिनिधी येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का, असा प्रश्न आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केले …

Read More »

मविआ सरकारचा महाढिसाळ कारभार; म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 12) आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली, मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने, तसेच रात्री …

Read More »

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

11 दिवसांत एकच मृत्यू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे.  डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले …

Read More »

ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!

मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने आयात करण्यात येणार्‍या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्‍या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने …

Read More »

मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाची अवस्था करण्याचा डाव

आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील संपकरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी येत्या सोमवारनंतर संपकर्‍यांना मेस्मा कायदा लावण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करीत मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप केला …

Read More »

नवी मुंबईत उभारला ’पेट कॉर्नर’

नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत ’पेट कॉर्नर’सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना नवी मुंबई पालिकेने राबवली आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते देशातील ह्या पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले, …

Read More »

जनरल बिपीन रावत यांना आदरांजली

खारघर : रामप्रहर वृत्त भारताचे पहिले रक्षा प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या सहकार्‍यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी अपघाती निधन झाले. त्यांना व त्यांच्या सहकार्‍यांना भारतीय जनता पक्ष खारघर परिवाराकडून खारघर सेक्टर 13 येथील जनसंपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा …

Read More »

महामार्गावरील दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे

नवी मुंबई : बातमीदार सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महापालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते, मात्र आता सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी …

Read More »

नवी मुंबईतील गावठान घरांवर हातोडा

बेकायदेशीर बांधकामांना मात्र अभय; सिडको व पालिकेच्या कारवाईबाबत संशय? नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई केली जात आहे. यामध्ये गावठाणातील बांधकामांना लक्ष केंद्रित असताना सिडको वसाहतीतील बेकायदेशीर बांधकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. गाव आणि शहर असा भेदभावामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्न निर्माण झाला आहे …

Read More »

मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते

जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री …

Read More »