खारघर : रामप्रहर वृत्त भारताचे पहिले रक्षा प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत व त्यांच्या सहकार्यांचे 8 डिसेंबर 2021 रोजी अपघाती निधन झाले. त्यांना व त्यांच्या सहकार्यांना भारतीय जनता पक्ष खारघर परिवाराकडून खारघर सेक्टर 13 येथील जनसंपर्क कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. या वेळी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा …
Read More »महामार्गावरील दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे
नवी मुंबई : बातमीदार सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महापालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते, मात्र आता सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी …
Read More »नवी मुंबईतील गावठान घरांवर हातोडा
बेकायदेशीर बांधकामांना मात्र अभय; सिडको व पालिकेच्या कारवाईबाबत संशय? नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई केली जात आहे. यामध्ये गावठाणातील बांधकामांना लक्ष केंद्रित असताना सिडको वसाहतीतील बेकायदेशीर बांधकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. गाव आणि शहर असा भेदभावामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्न निर्माण झाला आहे …
Read More »मनपा निवडणुकांवेळी शिवसेना वॉर्ड रचनेत सोयीस्कर बदल करते
जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुका आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी महापालिका अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री …
Read More »राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा; भव्य पारितोषिके
मुंबई ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 21वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वांत मोठ्या बक्षीस रकमेची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाला प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये व …
Read More »‘दिबां’चेच नाव विमानतळाला दिले पाहिजे
सर्वपक्षीय कृती समिती मागणीवर ठाम नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नेतृत्व व कर्तृत्व श्रेष्ठ होते व राहील. ते देशाला दिशा देणारे नेते होते. ‘दिबां’च्या जयंती दिनी 13 जानेवारी रोजी मेळावा घ्यायचा की आंदोलन करायचे याबाबत 1 जानेवारी रोजी घोषणा केली जाईल, पण त्यांचे …
Read More »ऊर्जामंत्री राऊतांनी राजीनामा द्यावा
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत …
Read More »राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ओबीसी जागांवरील निवडणुका स्थगित
मुंबई ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये एकूण एक हजार 802 जागांसाठी निवडणूक होणार होती. यापैकी ओबीसींच्या 344 जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर …
Read More »शासनाचे भूखंड आरक्षणावर निर्बंध
पालिकेच्या विकास आराखड्यावर फिरवले पाणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अडीच वर्षांपूर्वी पालिका सभागृहाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या भूखंडावरील आरक्षणाला नगरविकास विभागाने निर्बंध घातले आहेत. तसेच 500 मीटरवरील क्षेत्राफळाचे भूखंड विकण्याची सिडकोला मुभा दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यावर शासनाने पाणी फिरवले आहे. पालिकेला भविष्यात लागणार्या …
Read More »ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; राज्य सरकारला धक्का
मुंबई ः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सोमवारी (दि. 6) सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेशही दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी समाजाला …
Read More »