मुंबई ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का याकडे लक्ष लागले होते, मात्र निवडणूक आयोगाने सरकारचा प्रस्ताव फेटाळत आरक्षणाशिवाय संबंधित 27 टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारित तारीख …
Read More »…तर भाजप आंदोलन करेल!; ओबीसी आरक्षणावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारकडे कोणतीही सबब उरलेली नसून या सरकारने डेटा गोळा करण्यात अजूनही टाळाटाळ केली तर भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा …
Read More »नवी मुुंबईत ऑक्सिजन प्लांटची उभारणी; शिंडलर कंपनी व तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा संयुक्त उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नव्या विषाणूचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्राला ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. भविष्यात जर कोरोनाची तिसरी लाट आली, तर एकाही रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी नेरूळ, नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व …
Read More »खारघर भाजपतर्फे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम उत्साहात साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रदेश भाजप व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या व विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खारघर भाजपतर्फे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची पुनर्बांधणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी खारघर सेक्टर 12 मधील दुर्गा माता मंदिर …
Read More »जे नियम एमआयएमसाठी होते तेच राहुल गांधींच्या सभेसाठी असतील; परवानगीवरून गृहमंत्र्यांचे सूचक विधान
मुंबई ः प्रतिनिधी येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता राहुल गांधींच्या सभेला परवानगी मिळणार का, असा प्रश्न आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केले …
Read More »मविआ सरकारचा महाढिसाळ कारभार; म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 12) आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली, मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने, तसेच रात्री …
Read More »नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात
11 दिवसांत एकच मृत्यू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले …
Read More »ठाकरे सरकारच्या काळात दारू झाली स्वस्त!
मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने आयात करण्यात येणार्या स्कॉच, व्हिस्कीसह अन्य काही दारूंवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणार्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किमतीएवढी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने 18 नोव्हेंबर रोजी दारूवरील विशेष शुल्कात कपात केली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने …
Read More »मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाची अवस्था करण्याचा डाव
आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील संपकरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी येत्या सोमवारनंतर संपकर्यांना मेस्मा कायदा लावण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करीत मुंबईतील मिल कामगारांच्या संपाप्रमाणेच एसटी संपाचीही अवस्था करण्याचा डाव असल्याचा आरोप केला …
Read More »नवी मुंबईत उभारला ’पेट कॉर्नर’
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2022ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत ’पेट कॉर्नर’सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना नवी मुंबई पालिकेने राबवली आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते देशातील ह्या पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, …
Read More »