तोटा होत असल्याने सेवा सुरू करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 180 विद्युत बस दाखल झाल्या आहेत, मात्र यातील फक्त 50 बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. 130 बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत. विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. 130 पर्यावरण पूरक …
Read More »विष्णुदास भावे नाट्यगृहही आजपासून सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांतील तिसरी घंटा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 22 ऑक्टोबर पासून पुन्हा वाजणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृदेखील नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी …
Read More »टाकेदेवीत नवरात्रोत्सवात मोफत चहापाणी व्यवस्था
आमदार महेश बालदी यांचे भाविकांनी मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त नवरात्री उत्सवात दांड फाटा येथील टाकेदेवी देवीचे 20 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने मोफत चहा पाण्याची सुविधा देण्यात आली होती. याबद्दल भाविकांनी आमदार महेश बालदी …
Read More »मंदा म्हात्रेंच्या आमदार निधीतून रुग्णालयातील एमआरआय मशीन
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचणी मशीन उपलब्ध करण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह चर्चा केली आहे. या संदर्भात आमदार मंदा …
Read More »अवैध पार्किंगवर कारवाई करा
भाजप ट्रान्सपोर्ट सेलची मागणी; वाहतूक पोलिसांना निवेदन उरण : रामप्रहर वृत्त जासई ते गव्हाण टाकी व वीरगो यार्ड ते पागोटे उड्डाण पूल (एनएच-4बी) या रस्त्याच्या दुतर्फा अनेक गाड्या अवैधपणे पार्किंग केलेल्या असतात. या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी केली आहे. या …
Read More »दिवाळीत कोरोना आकडेवारीबाबत नवी मुंबई महानगरपालिका दक्ष
मृत्यूदरात घट असली तरी काळजी घेण्याचे आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीसारखा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये याकरिता दक्ष असणार आहे. मृत्यूदरात घट होत असली तरी दिवाळीमध्ये नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी …
Read More »झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; पनवेल मनपा महासभेत पुनर्वसनास मंजुरी
पनवेल ः प्रतिनिधी येथील महापालिकेने झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी पहिले पाऊल उचलत पनवेलमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पातून झोपडपट्ट्यांचा विकास करणे, परवडणारी घरांची निर्मिती करणे याकरिता इमारत बांधकाम व पायाभूत सुविधा तयार करण्यास महासभेने बुधवारी (दि. 20) मंजुरी दिली. कोरोना संसर्गामुळे ज्या महिलांचे पती …
Read More »कामोठ्यात भाजप पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष कामोठे शहर मंडल अंतर्गत विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्यांचा नियुक्तीप्रदान सोहळा मंगळवारी (दि. 19) झाला. कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र …
Read More »अलिबागच्या शर्विकाची आणखी एक उत्तुंग झेप; गुजरातचे गिरनार शिखर केले सर
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागची चार वर्षीय बाल गिर्यारोहक शर्विका जितेन म्हात्रे हिच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. तिने गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर सर केले असून अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली कन्या ठरली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर वसलेल्या गिरनारच्या गुरुशिखर या सर्वोच्च स्थानी …
Read More »मविआ सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले; जागर अभियान मेळाव्यात फडणवीसांचा हल्लाबोल
ठाणे ः प्रतिनिधी राज्यात ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. ओबीसींना न्याय मिळत नाही, तोवर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 20) राज्य सरकारला दिला. भाजपच्या ठाणे-कोकण विभागीय ओबीसी जागर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper