पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अद्यापही नियमित सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील बहुतांश ग्रामस्थांना कंपनीत, तसेच महिलांना काम करण्यासाठी शहरात जावे लागत असते. एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने परवडत नाही. त्यामुळे त्यांनी पेण-जावळी एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी …
Read More »पाणीदार ग्रामपंचायत-जामरुंग
कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील पाण्याच्ता स्त्रोतांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत पाणीदार बनवली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व भागात पाणी साठवण करण्याचे यशस्वी नियोजन करून तसेच सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांची निर्मिती करून जलसाक्षरता मोहीम राबविण्याचे यशस्वी काम जामरुंगसारख्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीने …
Read More »दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाई
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर नियमित होणार्या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. दिघोडेपासून ते गव्हाण फाट्यापर्यंत महामार्गालगत असलेल्या अनधिकृत कंटेनर गोदामांमधील अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळे सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबरपासून सकाळी 6 ते रात्री …
Read More »सिडकोकडील सेवा पनवेल मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामाला वेग
पनवेल : प्रतिनिधी सिडकोकडील सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरणाच्या दृष्टीने सिडको अधिकार्यांबरोबर सेवा पाहणी महापालिका अधिकार्यांनी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. 30) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी संबधित विभागाकडून या पाहणीचा आढावा घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सिडको प्राधिकरणाच्या हस्तांतरण होणार्या सेवा-सुविधा पाहणी कार्यक्रम हाती 27 सप्टेंबरपासून घेतला आहे. …
Read More »राज्य शासनाची ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी; उरणमधील 80 टक्के शेतकरी अँड्रॉइड मोबाइलअभावी सुविधेपासून वंचित
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न उरणच्या शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना अनिवार्य करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करून ती महसूल विभागाच्या यंत्रणेकडूनच करण्यात यावी, अशी मागणी सामान्य शेतकर्यांकडून करण्यात …
Read More »अमृतमय भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर भराभरा निर्णय घेत सर्वप्रथम देशभरात झाडझूड आणि स्वच्छता सुरू केली. मग तो भ्रष्टाचाराचा केरकचरा असो किंवा गावोगाव, गल्लोगल्ली साचलेला खराखुरा उकिरडा. हे पंतप्रधानांचे सर्वंकष असे स्वच्छता अभियान होते. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्याचा पंतप्रधानांचा इरादा यात स्पष्टपणे दिसतो आणि समाधानाची बाब …
Read More »अंधेर नगरी…
गेल्या दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेले विविध घोळ पाहता महाराष्ट्राच्या जनतेला रोज कालचा गोंधळ बरा होता असेच म्हणावेसे वाटत असेल. एकेकाळी याच महाविकास आघाडी सरकारने डोक्यावर घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आता गायब असल्याचे सांगण्यात येते आहे. खरे काय नि खोटे काय हे यथावकाश बाहेर …
Read More »कुंडी नदी परिसरात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील वाजेपूर गावातील कुंडी नदी परिसरात वर्षासहलीसाठी गेलेले काही पर्यटक अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकले होते. त्यांना सुखरूप स्थानिक ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी काहीजण त्या भागात पर्यटनासाठी गेले होते, परंतु अचानकपणे पाण्याचा लोंढा …
Read More »बेकायदा गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्यावर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या टँकरद्वारे गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करणार्या चार जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून गॅस टँकर, मोटार सायकल, महिंद्रा कंपनीचा बोलरो या मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. …
Read More »शौर्य दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने शौर्य दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात आपले मदतकार्य सुरू ठेवत कौतुकास्पद कामगिरी करणार्या आजी-माजी सैनिक, पोलीस आधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper