Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची जोरदार टीका

मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. विरारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. …

Read More »

विषारी दृष्टिकोन

कोरोना विषाणूच्या महासाथीची दुसरी लाट अवघ्या देशाचे कंबरडे मोडते आहे आणि त्याच वेळेला काही राजकीय पुढार्‍यांना त्यातही राजकारण सूचते ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन बैठकीच्या वेळी आले. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधानांकडे मदतीचा धावा केला. केजरीवाल यांचा हा …

Read More »

खालापुरात पाच लाखांचा गुटखा जप्त

खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील माजगाव येथे एका किराणा स्टोअर्सवर धाड टाकून सुमारे पाच लाख किमतीचा गुटखा खालापूर पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.माजगाव गावाच्या नाक्यावर असणार्‍या माही किराणा स्टोअर्समध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला विक्रीसाठी आणला आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश पनवेल ः रामप्रहर वृत्तकोन-सावळे रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या विकासकामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील, परंतु उरण विधानसभा मतदारसंघात …

Read More »

जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी आता ई-पास आवश्यक

सतत बदलणार्‍या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. 13 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानंतर 22 एप्रिलपासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास गरजेचा असल्याचे महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. दरम्यान, …

Read More »

वर्तमानपत्र विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

बँक कर्मचारी संघटनेच्या स्थापना दिनी सामाजिक उपक्रम पनवेल : वार्ताहर बँकिंग उद्योगातील बहूसंख्य असलेल्या एआयबीईए (बँक कर्मचारी) संघटनेने आपला 76वा स्थापना दिन भारत भारत मोठ्या उत्साहाने साजरा केला. या वेळी भारत भारत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आलेत. त्याच अनुषंगाने संघटनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी पनवेलमधील वर्तपानपत्र विक्रेत्यांना मास्क …

Read More »

रिक्षाचालकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य; विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. लॉकडाऊन असो किंवा नसो कार्यक्रमाचे स्वरूप बदलले असले तरी कार्यक्रमात कुठेही खंड नाही. पनवेलमधील ट्रू रेट इन्शुरन्स यांच्यावतीने रिक्षाचालकांना कमी किंमतीत …

Read More »

नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानांवर कारवाई

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले असुनदेखील काही दुकानदार ही बाब गंभीरपणे घेत नसल्याने पालिकेच्या जी विभाग कार्यालयातील दक्षता पथकातील कर्मचार्‍यांनी दुकान मालकास सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करून अकरा नंतर दुकान सुरू ठेवले होते. यामुळे या दुकानमालकावर कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून 50 हजार …

Read More »

जम्बो कोविड केअर सेंटर उभारणीच्या हालचालींना वेग

खारघर, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेलमध्ये जम्बो कोविड केअर उभारण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. शासकीय मान्यतेनंतर कळंबोली येथील भारतीय कपास निगमचे गोदाम अधिग्रहण करण्यास मंजुरी दिल्यानंतर महसुल विभागाने हे गोदाम ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रुग्णांना ऑक्सिजन आणि …

Read More »

भाजयुमोतर्फे कोरोना सहाय्यता हेल्पलाइन

मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल : वार्ताहर वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने कोरोना काळात गरजू नागरिकांना मदत करता यावी यासाठी हेल्पलाइनची सुविधा तयार केली आहे. ही सुविधा राज्यपातळीवर काम करणारी आहे. नुकताच 02067326090 या राज्यव्यापी हेल्पलाइनचा शुभारंभ भाजयुमोच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकट काळात …

Read More »