Breaking News

महत्वाच्या बातम्या

पागोट्याच्या सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

गुप्त मतदानाद्वारे आठ विरुद्ध दोन निकाल उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 29) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सरपंचांविरोधातील अविश्वासाचा ठराव आठ विरुद्ध दोन असा …

Read More »

पनवेलमध्ये चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते  शहरातील लाइफलाइन हॉस्पीटल येथे चौथ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपायुक्त संजय शिंदे, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर पराग बेडसे, डॉ. आनंद गोसावी, चांडक, रेहाना, डॉ.लोहारे, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. केतकी …

Read More »

जेएनपीटीचा सेझच्या डीपीआरसाठी पुढाकार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) नौकानयन मंत्रालयाच्या ’सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत बहुउत्पाद विशेष आर्थिक क्षेत्र (मल्टीप्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन) (एसईझेड) विकसित करीत आहे. नवी मुंबई येथील जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या 277 हेक्टर जमीनीवर हे सेझ विकसित करण्यात येत आहे. जेएनपीटी-सेझ साठीचा विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार …

Read More »

उरण येथे राम निधी अभियानांतर्गत बाईक रॅली

उरण : वार्ताहर अयोध्येत उभारण्यात येणार्‍या श्रीराम मंदिरासाठी राम मंदिर निधी अभियाना अंतर्गत उरणमध्ये मंगळवारी (दि. 26) सायंकाळी बाईक रॅली आणि रथ यात्रा काढण्यात आली. प्रथम मोरा येथील राम मंदिरात भाजप उरण व्यापारी असोशिएशचे अध्यक्ष हितेश शाह, अभियान प्रमुख दर्शन पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व बाईक रॅली, रथ …

Read More »

भारताने जगाला कोरोना संकटातून वाचवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने कोरोना नियंत्रणात आणून जगाला एका मोठ्या संकटातून वाचवले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित ’दावोस अजेंडा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. या वेळी जगभरातील 400 मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा महाअंतिम फेरीचे आज उद्घाटन

विजेत्या एकांकिकेला एक लाख आणि मानाचा ‘अटल करंडक’ पनवेल ः प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा होत असून, स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला …

Read More »

रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे …

Read More »

पनवेल मनपा करणार खेळांच्या मैदानांचा विकास

खारघरमधील मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या …

Read More »

मॉर्निंग वॉकसाठी जाताना भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप लोणंद ः प्रतिनिधीखंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ गुरुवारी (दि. 28) मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या सुनेचा समावेश आहे.लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळा परिसरात गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन धायगुडे (70), शांताबाई धायगुडे (64) …

Read More »

संकटांशी लढा देण्यास भारत सज्ज -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असो किंवा देशाच्या सीमांवरील आव्हाने असोत; भारत संकटांशी लढा देण्यास नेहमी सज्ज असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना या वेळी गार्ड ऑफ ऑनरही …

Read More »