Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुद्ध दोन हात’

मुंबई : प्रतिनिधी वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुध्द दोन हात करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धोरणावरून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी …

Read More »

टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी लसीकरण कार्यक्रमात अकार्यक्षमता; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची ओरड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणार्‍या …

Read More »

मनोरंजनाचे तांडव

केंद्र सरकार काही महत्त्वाची पावले टाकत असले तरी अजुनतरी ओटीटी व्यासपीठांना लगाम घालणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे मान्य करावे लागेल. अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. ओटीटी कार्यक्रमांना सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लावला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक चवताळून उठतात आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना मोकळे सोडले तर तांडव सारखा पेचप्रसंग …

Read More »

पनवेलच्या सौंदर्यीकरणात पडणार भर

विविध विषयांना महासभेत मंजुरी पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या बुधवारी (दि. 20) झालेल्या महासभेत कळंबोली येथील सेक्टर 6मध्ये आयजीपीएल कंपनीच्या सीईआर फंडातून उभारण्यात येणारे उद्यान, सेक्टर 11मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय  सभागृह आणि पनवेल शहरातील लेंडाळे तलावाच्या सुशोभीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पनवेलच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.पनवेल महापालिकेची महासभा आद्य …

Read More »

कोरोना काळात 10 हजार रक्तपिशव्यांचे संकलन

प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे अभियान पाली : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक व पाली (ता. सुधागड) येथील जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांच्या पुढाकाराने कोरोना काळात तब्बल 10 हजार रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रा. …

Read More »

पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे मुरूडमध्ये वाटप

मुरूड : प्रतिनिधी येथील स्टार फाऊंडेशनतर्फे मुरूड शहरातील सुमारे 330 कुटुंबांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान जनआरोग्य योजना केंद्र शासनाकडून राबवली जात असून, या योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. स्टार फाऊंडेशनने  संगणकाचा वापर करून ज्यांची नावे या योजनेत आली …

Read More »

पेणमध्ये बर्ड फ्लूमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क

पेण : प्रतिनिधी पशुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील बंदिस्त 562 कोंबड्यांपैकी पाच कोंबड्यांना ’बर्ड फ्लू‘ ची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने अंतोरे फाटा परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.  कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे …

Read More »

राम मंदिरासाठी यथाशक्ती निधी द्या

जैन मुनी विजय महाराज यांचे खोपोलीत आवाहन खोपोली : प्रतिनिधी समाजात वाढलेला व्यभिचार, लुटारु प्रवृत्ती, वाईट मार्गाने संपत्ती कमविण्याचा मोह या सर्व बाबी नष्ट करायच्या असतील तर, मर्यादा पुरुषोत्तम, संयमी व दुसर्‍याबद्दल आदर असणार्‍या प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणे काळाची गरज आहे, याकरीता प्रत्येक भारतीयाने यथा शक्ती निधी दिला …

Read More »

पती-पत्नीमधील वाद वाढले!; वर्षभरात 633 तक्रारी; 151 प्रकरणांत समुपदेशन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था …

Read More »

भाजप सोशल मीडिया सेलची कोकण-ठाणे विभागीय बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप सोशल मीडिया सेल कोकण-ठाणे विभागीय पदाधिकार्‍यांची बैठक प्रदेश संयोजक प्रवीण अलाई, सहसंयोजक समीर गुरव, आयटी सेल प्रदेश प्रमुख सतिश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 20) पनवेलमध्ये झाली.या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली तसेच मान्यवरांनी मार्गदर्शन केले.पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या …

Read More »