नागोठणे ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे यंदा गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव पूर्णपणे शांततेत पार पडला. शहरात यंदा मोठ्या हंडी बांधल्याच नसल्याने गोविंदांच्या उत्साहावर पाणी पडले. शहरात मंगळवारी रात्री 12 वाजता राधाकृष्ण मंदिर तसेच कानिफनाथ मठात श्रीकृष्ण जन्मसोहळाही काही निवडक भक्तांच्या उपस्थितीत उरकण्यात आला. प्रत्येक आळीतून निघणार्या गोविंदांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बंदी …
Read More »पेणच्या प्रांताधिकारीपदी विठ्ठल इनामदारांची नियुक्ती
पेण ः प्रतिनिधी महाड येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची पेणच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पेणच्या विद्यमान प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची महाड येथे बदली झाली असून, त्या महाडच्या प्रांताधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. मूळचे सांगली येथील विठ्ठल इनामदार यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे यापूर्वी काम केले आहे. त्याचप्रमाणे …
Read More »नागरिकांच्या गर्दीने बँका फुलल्या
महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये मागील काही दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन दिवस सुटीचे गेल्याने सोमवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाल्याने शहरातील विविध बँकांमधून एकच गर्दी दिसून येत होती. या गर्दीचे शहरातील नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी झालेला नाही. …
Read More »चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर
पाली ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमान्यांनी पाली-सुधागडात येण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त पालीत येणार्या चाकरमान्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत पाली व कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीने नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सवाकरिता गावी येणार असाल तर गावाकडे येऊन 10 दिवसांकरिता होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. गावाकडे होम क्वारंटाइन काळात शासनाने …
Read More »राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून भोसले कुटुंबीयांचे सांत्वन
महाड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथे त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. महाड भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले हे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे विश्वासू निकटवर्तीय होते. रविवारी (दि. 2) मुंबई येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटमध्ये कोरोनावर उपचार …
Read More »‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन; लॉकडाऊन उठवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी
कर्जत ः बातमीदार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन उठविण्यात यावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन केले जात आहे. कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतेच एसटी आगारात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष …
Read More »श्रीराम मंदिर उभारणीसाठी मदत
उरण : उरण शहरात गणपती चौकाजवळ असलेल्या 125 वर्षांपासूनच्या जुन्या श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी मदत म्हणून प. पू. स्वामी श्री. इंद्रदेवश्वरनंद सरस्वतीजी महाराज यांचे राधे राधे परिवार उरण समिती यांच्याकडून शनिवारी (दि. 8) एक लाख 51 हजार रुपये चेकच्या स्वरूपात समितीचे सभासद गणेश गायकवाड, पत्रकार अतुल पाटील, …
Read More »गुणवंत विद्यार्थ्यांचा गव्हाणमध्ये सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020 मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …
Read More »आदिवासी वस्तीवर धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था, खोपोली मठाधिपती योगी भाईनाथ महाराज यांच्या वतीने शिरवली ग्रामपंचायत अंतर्गत भल्ल्याची वाडी येथील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे आदिवासींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. पत्रकार मयूर तांबडे यांनी या परिस्थितीची दखल घेवून विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. …
Read More »गोकुळाष्टमीनिमित्त नवचंडी होम पूजा
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली. कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper