Breaking News

महत्वाच्या बातम्या

होम क्वारंटाइन व्यक्तींना ऑनलाइन सल्ला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या नागरिकांना आता घरीच म्हणजे होम क्वारंटाइन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये होम क्वारंटाइन रुग्णांना डॉक्टरांतर्फे वीडियो कॉल अथवा फोन कॉलमार्फत वैद्यकीय सल्ला दिला जातो. कोरोनाची सौम्य …

Read More »

आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; पोलिसांसह वकिलाचीही तारांबळ

पनवेल : बातमीदार – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला 30 वर्षीय आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तळोजा पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह वकिलपत्र स्वीकारलेल्या आरोपीच्या वकिलाचीही तारांबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर संपर्कातील 15 पोलीस कर्मचारी आणि वकील यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. 7 जून …

Read More »

मुख्यमंत्री नाही पण माजी मुख्यमंत्री आले

लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण; देवेंद्र फडणवीस यांची वादळग्रस्त मुरूडमध्ये पाहणी मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग वादळी वार्‍यामुळे मुरूड तालुक्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. असे असताना सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फक्त अलिबागलाच भेट दिली. मुरूड तालुक्यात भेट न दिल्याने येथील नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व …

Read More »

पनवेल तालुक्यात 51 जण पॉझिटिव्ह; 57 रुग्ण बरे

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण आढळले आहे. तर 57 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 55 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सात नवीन कोरोनाबाधित आढळले …

Read More »

कोकणचा आक्रोश

वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …

Read More »

नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला …

Read More »

सिडकोच्या मान्सूनपूर्व कामांची चौकशी करावी

नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी; अनियमित व निकृष्ट दर्जाची कामे असल्याचा आरोप कळंबोली : प्रतिनिधी कोरोना महामारीचा फायदा घेत सिडको अधिकारी व ठेकेदार यांनी साटेलोटे करत मान्सूनपूर्व कामांना थुकपट्टी लावण्याचे काम केले आहे. सिडको वसाहतीतील कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जावून  रहिवासींना अनेक समस्यांना सामोरे …

Read More »

पोलादपूर : तालुक्यातील पर्यटनक्षेत्र असलेल्या उमरठ, कुडपण आणि महादेवाचा मुरा या गावांतील अनेक घरे, वाडे व शौचालयांचे निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक झाडेही उन्मळून पडली. येथील नुकसानग्रस्त नागरिक शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. (छाया : शैलेश पालकर)

Read More »

मुरूड ः राजपुरी कोळीवाड्यात वादळी वार्‍यामुळे सर्वाधिक बोटी फुटून आर्थिक नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौर्‍यात या बोटींची पाहणी केली. या वेळी अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.

Read More »

शिवशाहीमधील एलईडी चोरणार्‍यास पोलिसांकडून अटक

पेण ः प्रतिनिधी पेणमधील रामवाडी बसस्थानकात पार्क करून ठेवलेल्या शिवशाही बसमधील एलईडी चोरणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीने त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस विभागीय कार्यशाळा रामवाडी येथे पार्क केली होती. त्यामधील 4200 रुपयांचा एलईडी डिस्पले आरोपीने चोरून नेला होता. या प्रकरणी सदर आरोपीला 8 जून रोजी रात्री अटक करण्यात आली. याबाबत …

Read More »