Breaking News

महत्वाच्या बातम्या

एनआरआयच्या घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणार्‍या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कचर्‍यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले …

Read More »

भाजपसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे त्याग आणि योगदान अमूल्य -आमदार गणेश नाईक

नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज संवाद मेळावा नवी मुंबई : बातमीदार केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा …

Read More »

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. 8) पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

अनधिकृत शाळांमुळे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील दहा शाळा अनधिकृत जाहीर केल्याने तेथील प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. त्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्याची व फी परत मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची? आपल्या पाल्याच्या भविष्याच्या चिंतेमुळे शिक्षण खात्याला एवढ्या उशिरा का जाग आली. या शाळा जाहिरात …

Read More »

कर्ज परतफेडीसाठी मंदिरातील देव पळवले

रेवदंडा मंदिर चोरीप्रकणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा येथील तीन मंदिरांमध्ये झालेल्या देवाच्या मूर्तींच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महेश चायनाखवा असे आरोपीचे नाव असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने या चोर्‍या केल्याचे तपासात पुढे आले आहे. 18 मे रोजी रेवदंडा थेरोंडा येथील खंडेराव पाड्यातील खंडोबा …

Read More »

हिंसाचारामागे कोण?

समाजमाध्यमे कशाप्रकारे माथी भडकवू शकतात याचे प्रत्यंतर गेले दोन-तीन महिने महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा येत आहे. जाणून-बुजून राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, का असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील ताज्या हिंसाचारानंतर उपस्थित केला आहे, तो रास्तच म्हणावा लागेल. कोल्हापुरात मंगळवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतानाच काही …

Read More »

तळीये दरडग्रस्तांना गृहप्रवेशाची प्रतीक्षा

महाड तालुक्यातील तळीये गावात 21 जुलै 2021 रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत गावातील 87 जणांचा बळी गेला. दरडग्रस्त तळीये गावच्या पुनर्वसन काम म्हाडामार्फत सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेला जवळजवळ दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत, परंतु या दरडग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. आता पावसाळा सुरू होईल. अजूनही त्यांचे …

Read More »

पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

अलिबाग : रामप्रहर वृत्त समग्र शिक्षातर्गत इ. पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या एक लाख …

Read More »

पनवेल मनपा नगर पथविक्रेता निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेलचा विजय

पनवेल : प्रतिनिधी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत ’फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते …

Read More »

गाडी लावण्याच्या भांडणातून पेणमध्ये एकाचा मृत्यू; संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड

पेण : प्रतिनिधी पेणमधील नाक्यावर दुकानासमोर गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या किरकोळ भांडणात एकाच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 8) घडली. यानंतर आदिवासी वाडीवरील संतप्त जमावाने दुकानाची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील वातावरण काही काळ तंग झाले होते. याबाबत माहिती अशी की, रोहन संतोष पवार (वय 26, रा. कामार्ली आदिवासीवाडी) हा …

Read More »