खालापूर : प्रतिनिधी निलंबित केलेल्या तीन कामगारांना कामावर घ्यावे, या व अन्य प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे औद्योगिक वसाहतीमधील कॉलेजंन्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 35कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज सातवा दिवस उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन किंवा संबंधीत शासकीय अधिकार्यांनी त्याची दखल न घेतल्याने …
Read More »मृगगडावरील स्वच्छता व संवर्धन मोहीम फत्ते, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. हा मृगगड जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत सातत्याने होत आहे. दुर्गवीर तर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यात महिला व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रशांत डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मृगगड किल्ल्यावरील पाण्याची …
Read More »उरण येथे मोटरसायकल रॅली
उरण : प्रतिनिधी उरण वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त उरण शहर व तालुक्यातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून, मोटरसायकल चालकांनी गाडी चालवितांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, या जनजागृती व प्रबोधनासाठी उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे दुचाकी स्वारांसाठी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे …
Read More »कल्चरल असोसिएशनच्या गायन स्पर्धेत नेहा पुरोहित प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कल्चरल असोसिएशन या संस्थेत हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा शनिवारी (दि. 11) व रविवारी (दि. 12) पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात झाली. राज्यभरातील एकूण 25 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोख सात हजार 500च्या प्रथम पारितोषिकाची खारघर येथील नेहा पुरोहित मानकरी ठरली. स्पर्धेत तिने …
Read More »माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप
खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी …
Read More »तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे रक्तदान शिबिर
कळंबोली : प्रतिनिधी तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांच्या प्रयत्नातून टीएमएमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या देशात आवश्यकतेनुसार 40 टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे. भारतात केवळ 0.6 टक्के लोक रक्तदान करतात. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये …
Read More »एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी पेणहून पालीला जाणार्या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेणहून …
Read More »कळंबोलीत रस्ता सुरक्षा अभियानात महिलांचा पुढाकार
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली वाहतूक विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा सप्ताह अंतर्गत एक रॅली सुरक्षिततेसाठी कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि. 16) करण्यात आले होते. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी या मार्गे कळंबोळी वाहतूक कार्यालयात या हेल्मेट बाईक रॅलीची सांगता झाली. या रॅली …
Read More »श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ
खांदा कॉलनी : देवी अंबा माता मंदिर सेक्टर 13 येथे मकरसंक्रांतीनिमित्त सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील व माता भगिनी उपस्थित होत्या.
Read More »विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सावरकर चौक-अमरधाम रस्त्याचे काँक्रीटीकरण पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या सावरकर चौक ते अमरधाम रस्त्याच्या काँक्रीटीकरणा संदर्भात महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पनवेल शहरातील महत्वाच्या असलेल्या रस्त्यापैकी प्रमुख रस्ता म्हणजे अमरधाम ते सावरकर चौक हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper