Breaking News

महत्वाच्या बातम्या

उमटे धरणातून अशुध्द पाणीपुरवठा, शुध्द पाणी पुरविण्याची भाजप नेते उदय काठे यांची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गढूळ पाणी पुरवठा होत असून, या चिखल मिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावा, यासाठी  योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपचे अलिबाग तालुका पं. स. सदस्य उदय काठे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 8 नोव्हेंबर रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाची तसेच मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीची माहिती देण्याकरिता ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य नारायण राजाध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर …

Read More »

आता थंडीची चाहूल

कर्नाळा (ता. पनवेल) : अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ यांची मालिका सरल्यानंतर वातावरणाने आपली कूस बदलली असून, आता थंडीची चाहूल लागली आहे. त्याची दस्तक धुक्याने दिली आहे. पहाटेच्या वेळी हिरव्यागार झाडीवर दवबिंदू जमा झाले असताना या धुक्यातून सूर्यनारायण आपले मोहक दर्शन देतो. निसर्गाची ही विविध रूपे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी आपल्या …

Read More »

उलवे विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  माजी विद्यार्थी किरण एकनाथ मढवी याने विद्यालयाशी बांधिलकी जपत 31 गरीब, गरजू विद्यार्थी दत्तक घेतले. या दत्तक विद्यार्थ्यांचा वर्षभर होणारा शैक्षणिक खर्च याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव वरदच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय …

Read More »

दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेलमध्ये; उसर्ली शाळेला मान

पनवेल : प्रतिनिधी रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड सोलापूर येथे बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना  नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना पनवेलकरांच्या साथीने तालुक्यात उसर्ली येथील …

Read More »

विमानतळ निर्मितीला वेग

धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात उरण ः रामप्रहर वृत्त गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम कंपनीला दिली आहे. …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या योजनेंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय एकात्मता शिबिर झाले. देशभरातून 600 कॅडेट्सने या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचा समारोप संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि …

Read More »

कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील घोट येथील हायकल लिमिटेडमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यानिमित्त कंपनीच्या गेटजवळ जय भारतीय कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) करण्यात आले. नामफलक …

Read More »

दीपाली कुंभारे-गोखे मिसेस टुरिझम ब्रँड अॅ्म्बेसेडर 2019

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील दीपाली कुंभारे-गोखे यांनी फिलिपिन्समधील मनिला येथे झालेल्या मिसेस टुरिझम 2019 या सौंदर्य स्पर्धेत मिसेस टुरिझम ब्रँड अ‍ॅम्बेसेडर 2019 हा किताब जिंकला. याबद्दल त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केेले. टुरिझमचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मेगास्टार प्रोडक्शन व मिसोसो लॉगी डायरेक्टर ओवेट रिकाडल्ये …

Read More »

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश असून, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी यांनी माजी आमदार विवेक पाटील आणि तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार बालदी …

Read More »