Breaking News

महत्वाच्या बातम्या

जेएनपीटीने केला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य करार

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी अधिक गरजेचा असलेला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनलमध्ये सामंजस्य करार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयात-निर्यात मालाच्या एकत्रित रेल कंटेनरची हाताळणी करण्यासाठी 2007मध्ये जेएनपीटी, एनएसआयसीटी आणि जीटीआयमध्ये इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसंदर्भात सामंजस्य करार झाला होता, तथापि एनएसआयसीटी आणि …

Read More »

रायगडात वरुणराजाची रिपरिप सुरूच ; नागोठण्यात पुन्हा पूर

नागोठणे : प्रतिनिधी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि. 30) पहाटे आपले पात्र ओलांडून शहराच्या अनेक भागात प्रवेश केला.  त्यामुळे शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत पुराचा अनुभव घेतलेल्या नागोठणेकरांना मंगळवारी पुन्हा एकदा पुराला सामोरे जावे लागले. नागोठणे एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मरिआई मंदिर भागात पुराचे पाणी भरले होते. …

Read More »

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

अनेक जण आपला वाढदिवस मोठ्या हौसेने, डामडौलाने साजरा करतात. राजकीय क्षेत्रातील मंडळींचा वाढदिवस म्हणजे भव्य-दिव्य सेलिब्रेशन असते, परंतु काही नेते आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करतात. कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर त्याचे उत्तम उदाहरण आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाची वर्षा सहल रंगली

उलवे : रामप्रहर वृत्त मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची वर्षा सहल यंदा रविवारी (दि. 28)  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे येथे नेण्यात आली होती. ही सहल चांगलीच रंगली. आंतरराष्ट्रीय स्तराचे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहून पत्रकार व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. धो-धो कोसळणारा पाऊस आणि तरण तलावात …

Read More »

प्रशिक्षकपदासाठी विराटची शास्त्रींनाच पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. सध्या असलेले प्रशिक्षक रवी शास्त्री हे या पदावर कायम राहणार की नवे प्रशिक्षक टीम इंडियाला लाभणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने शास्त्रींनाच आपली पसंती …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात माहितीदूत उपक्रमाचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आणि  युनिसेफ व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ’युवा माहितीदूत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे  महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनेची …

Read More »

पुण्याच्या पराभवाची हॅट्ट्रिक

मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगाल वॉरियर्सने पुण्यावर मात केली. पुण्याचे खेळाडू या सामन्यात बंगालच्या झंझावाताचा सामनाच करू शकले नाहीत. दुसरीकडे बंगालने अष्टपैलू खेळ करीत सामन्यात बाजी मारली. पहिल्या सत्रापासून बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळ करीत सामन्यात आघाडी घेतली होती. चढाईपटू …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वावंजे आणि फणसवाडी शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वावंजे आणि फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी  (दि. 30) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून मार्गदर्शन केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना …

Read More »

सुगम संगीत स्पर्धेत ‘सीकेटी’च्या सुरांची मोहिनी

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईतील विक्रोळी येथील विद्या विकास सोसायटी संचलित मटकर संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 29 जुलै या त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा घेतली …

Read More »

गेल वादळ घोंगावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी करीत शतक लगावले. त्याने या वादळी खेळीत 12 षटकार व 7 चौकारांसह 54 चेंडूंत 122 धावा चोपल्या. अर्धशतक होण्यापूर्वी गेल इतका आक्रमक नव्हता. त्याने 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर …

Read More »