पाटणा : वृत्तसंस्था चारा घोटाळाप्रकरणात दोषी आढळलेल्या लालूप्रसाद यादवांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले असून त्यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. गेले 24 महिने ते तुरुंगात आहेत. लालूप्रसादांच्या जामिनाची मागणी करणार्या अर्जाला फेटाळताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केले …
Read More »मोदी पुन्हा सत्तेत आले, तरच भारतासमवेत चर्चा शक्य -इम्रान
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारतात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक वक्तव्य केले आहे. जर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेवर चर्चा होण्याची शक्यता अधिक आहे, मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य असून ते पाकसोबत …
Read More »गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणार्यांवर कडक कारवाई करा; प्रवासी संघटनांची मागणी
डोंबिवली ः प्रतिनिधी गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता, पण ती अडचण केवळ दिवा स्थानकातील प्रवाशांची नसून बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, कळवा आदी स्थानकांमधील प्रवाशांचीही आहे. त्यासाठी दरवाजा अडवणार्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या …
Read More »पवारांकडून जातीचे राजकारण : आढळराव-पाटील
पुणे ः प्रतिनिधी माझ्या 15 वर्षांच्या खासदारकीच्या काळात कोणाचीही जात काढली नाही, पण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल …
Read More »नक्षलग्रस्त भागात केला जातोय सावध प्रचार
गडचिरोली ः वृत्तसंस्था गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो, पण गडचिरोलीतील दुर्गम भागातील खेड्यांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार केला जातो. पक्षाचे झेंडे घेऊन कोणी फिरत नाही, ना गाडीवर लाऊड स्पीकर लावून घोषणा दिल्या जातात आणि याचे एकमेव कारण म्हणजे नक्षल्यांची भीती. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती, …
Read More »उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू; लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा इशारा
नागपूर ः प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याच किमतीत खपवून घेतला जाणार नाही. असा प्रकार करणारा व्यक्ती कितीही मोठा आणि कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. अशा उपद्रवी मंडळींना थेट कोठडीत डांबू, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे. 11 एप्रिलला देशाचे …
Read More »उरणमध्ये मामाचा भाचीवर अत्याचार
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील जासई डुंबा येथे राहणार्या एका नऊ वर्षांच्या मुलीवर तिच्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कारप्रकरणी आरोपीविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई डुंबा येथील महिला कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्यानंतर घरी एकटी असलेल्या …
Read More »बारणे आणि जगताप यांचे अखेर मनोमीलन
महायुतीमध्ये उत्साह; पार्थ पवारांना धक्का पिंपरी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांचे अखेर मनोमीलन झाले आहे. या दोघांची सोमवारी (दि. 8) पिंपरीत संयुक्त पत्रकार परिषदेस उपस्थिती लाभली. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये …
Read More »संकल्पित भारत, सशक्त भारत!
भाजपचा सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 8) आपला जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपने त्याला संकल्पपत्र म्हटले असून, याद्वारे ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’चा निर्धार केला आहे. या जाहीरनाम्यात शेतकर्यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंत सर्वांची काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड …
Read More »खासदार श्रीरंग बारणे आज अर्ज भरणार
पनवेल : शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 10 वाजता आकुर्डी ते निगडी प्राधिकरण कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper