Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘त्या’ खुनी आरोपींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पनवेेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांची पथके …

Read More »

हातभट्टीवर पोलिसांची धाड पाणदिवे येथून गावठी दारूचे साहित्य हस्तगत

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाणदिवे येथील पूर्वेकडील जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर उरण पोलिसांनी धाड टाकली असून, हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणार्‍या साहित्यासह हजारो रुपये किमतीचे द्रावण जप्त करण्यात आले आहे, मात्र हातभट्टीची दारू तयार करणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. उरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्व विभागातील पाणदिवे येथील …

Read More »

कार्यकर्त्यांनो, मतदारांपर्यंत पोहोचा : लोकनेते रामशेठ ठाकूर

कामोठे : प्रतिनिधी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक मतदारही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचावे. त्याद़ृष्टीने काम करा आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 31) कामोठे येथे केले. …

Read More »

सुनील तटकरे सांगा कोणाचे?

अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षात आहेत, अशी चर्चा सध्या अलिबाग शहरात रंगली आहे. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ अलिबाग तालुक्यात आतापर्यंत तीन सभा झाल्या. त्यातील दोन सभा शेकापने पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक शेकाप कार्यकर्त्यांसाठी होती. …

Read More »

मेस्सीच्या जादूमुळे बार्सिलोनाची भक्कम आघाडी

माद्रिद : वृत्तसंस्था लिओनेल मेस्सीने जादुई खेळाचे दर्शन घडवत केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ईस्पानयोलवर 2-0ने मात केली, तसेच ला लिगा फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्धी संघांपेक्षा 10 गुणांची भक्कम आघाडी मिळवली आहे. ईस्पानयोल संघाने सामन्याच्या पूर्वार्धात अत्यंत निकराची झुंज दिली. मेस्सीसह अन्य आक्रमकांच्या आक्रमणांना ईस्पानयोलने रोखले. बार्सिलोनाचे आक्रमण यशस्वी होणार नाही, याची …

Read More »

पार्थ यांना पाहताच अजित पवार निघून गेले

पिंपरी : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, पण या ठिकाणी पोहोचण्यात पार्थ यांना तब्बल दीड तास उशीर झाला. पार्थ हे जेव्हा मेळाव्यास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पाहून राष्ट्रवादीचे नेते व पार्थ यांचे वडील अजित पवार तिथून निघून गेले. त्यामुळे …

Read More »

काँग्रेसला झटका; फेसबुकने 687 पेसेज, अकाऊंट हटवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराने जोर धरलेला असतानाच फेसबुकने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. फेसबुकवरील काँग्रेसशी संबंधित 687 पेसेज आणि अकाऊंट डिलिट केली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसशी संबंधित काही फेसबुक पेज आणि अकाऊंटवरून खोट्या बातम्या, खोटी माहिती प्रसारित केली जात होती. …

Read More »

थेंरोडा येथील कबड्डी स्पर्धेत दर्यावर्दी नागाव प्रथम

रेवदंडा : प्रतिनिधी जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा आयोजित कबड्डी स्पर्धेत दर्यावर्दी नागाव संघाने विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक शिवछत्रपती भाल, तृतीय क्रमांक साईनाथ शिरगाव, तर चतुर्थ क्रमांक शितळादेवी चौल या संघाने पटकाविला. रेवदंडा हरेश्वर मैदानात शनिवारी (दि. 30) 16 निमंत्रित संघांमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ रेवदंडा …

Read More »

रोनाल्डोच्या अनुपस्थितीत कीनने युव्हेंटसला तारले

मिलान : वृत्तसंस्था ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला उदयोन्मुख युवा फुटबॉलपटू मोइस कीन याने एक गोल लगावत युव्हेंटसला एम्पोलीविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे सेरी ए लीगच्या गुणतालिकेमध्ये युव्हेंटसला 18 गुणांची आघाडी मिळाली आहे. युव्हेंटसने एम्पोलीविरुद्धच्या सामन्यात कीनला प्रारंभी उतरवले नव्हते, मात्र मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता …

Read More »

सुनीत जाधवच ‘भारत श्री’

मुंबई : प्रतिनिधी सुनीत जाधवला फक्त सुनीत जाधवच हरवू शकतो. हे सुनीत जाधवचं बोल खरे ठरले. काहींनी सुनीतला स्वतःबद्दल अतिआत्मविश्वास असल्याचे टोमणे मारले होते, पण सुनीतने चेन्नईत झालेल्या 12व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत आपणच सुलतान असल्याचे दाखवून दिले. गतवर्षी राम निवासकडून पराभूत झालेल्या सुनीतने आपल्या पराभवाचा वचपा काढत चार वर्षांत …

Read More »