Breaking News

महत्वाच्या बातम्या

काळवीट शिकार प्रकरण; सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रेला हायकोर्टाची नोटीस

जोधपूर ः वृत्तसंस्था राजस्थानमधील काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. …

Read More »

इथिओपिया दृर्घटनेतील मृतांत भारतीय महिला अधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या चारवरून सहा इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणार्‍या …

Read More »

‘मी खोटी आश्वासने देत नाही’

नागपूर ः प्रतिनिधी मी खोटी आश्वासने देत नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसारखी मूल्येच मोठ्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे माध्यम असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारण हे एक प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे. जिथे लोकांच्या आकांक्षेनुसार काम …

Read More »

रमजानमध्ये शुक्रवारी मतदान नाही ः निवडणूक आयोग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक …

Read More »

निर्व्यसनी रहा आणि यशस्वी व्हा -शिक्षणतज्ञ विद्या वाडकर

पनवेल : प्रतिनिधी अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 9) पनवेल तालुक्यातील सांगुर्ली येथे व्यसनमुक्तीपर उपक्रम घेण्यात आला. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नभी घेऊ उत्तुंग भरारी हा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणतज्ञ तथा चित्रपट अभिनेत्री विद्या वाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, निर्व्यसनी …

Read More »

‘द्रोणागिरी’वर विजय दिन

उरण : बातमीदार उरण तालुक्यात समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा 280वा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 10 मार्च 1739 रोजी सरखेल मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून स्वराज्यात घेतला होता. उरण तालुक्याच्या इतिहासाचा  जिवंत साक्षीदार असलेला द्रोणागिरी किल्ला …

Read More »

दुचाकीस्वारांनी मोबाईल खेचला

पनवेल : बातमीदार रस्त्याने चालत घरी जात असलेल्या 27 वर्षीय तरुणाच्या हातातील 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना रोडपाली येथे घडली. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. रोडपाली येथील जयवंतसिंग मनजितसिंग धालीवाल हे रोडपाली येथील घरी रोडने पायी फोनवर बोलत जात असताना, त्यांच्याजवळून रोडपाली सेक्टर 17कडे …

Read More »

वाकडी-दुंदरे रस्ता खड्ड्यात; परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा वाकडी-दुंदरे रस्ता खड्यात गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात आली नाही; तर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाकडी, चिंचवली, रिटघर, दुंदरे या गावांना जोडणारा हा तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता असून, मोठ्या संख्येने …

Read More »

दहशतवाद सहन करणार नाही : मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) …

Read More »

वलपमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन अनेक जण या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे भाजपची विकासकामे पाहून शेकापच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) पक्षप्रवेश केला. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल मालधक्का येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या …

Read More »