जम्मू : वृत्तसंस्था जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर …
Read More »महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे …
Read More »ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर तळोजा येथील टी.सी.आय.एक्स्प्रेस कंपनीत घडलेल्या विचित्र अपघातात एका ट्रकचालकाचा त्याच्याच ट्रकखाली येऊन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. श्याम अशोक धुसाणे (38) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. या घटनेला दुसरा ट्रकचालक जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत ट्रकचालक श्याम धुसाणे …
Read More »निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहात व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथील निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहातील पोलीस महिलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी कारागृहाच्या संकुलात बुधवारी (दि. 6) एका प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात निरामय हॉस्पिटलतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कॉर्पोरेट ट्रेनर तरन्नुम डोब्रियाल यांनी ’शारीरिक व मानसिक संतुलन’यावर मार्गदर्शन केले. रोजचा …
Read More »गाडीच्या डिक्कीतून 82 हजार रुपयांची चोरी
पनवेल : बातमीदार : धान्य विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या एका व्यापार्याच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 82 हजार रुपये लंपास केले आहेत. शहर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.रमनीकलाल लालाजी देडीया (64) यांनी दुकान बंद करून दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे 82 हजार रुपये त्यांनी चेन असलेल्या बॅगेमध्ये ठेवून ते दुकान बंद करून …
Read More »नवी मुंबईकरांसाठी पाताळगंगेचे पाणी
मोरबे प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणीसाठी प्रस्ताव आयआयटीकडे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : नवी मुंबईची पुढील 20 वर्षांनंतरही तहान भागविण्यासाठी पालिका प्रशासनाने आताच तयारी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पातळगंगा नदीतून पाणी उचलून ते मोरबेत टाकण्यासाठीचा प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी 282 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रस्ताव …
Read More »हातपाटी व्यावसायिकांना सरकारचा आधार
सर्व गट खुले करा -महसूल मंत्री महाड : प्रतिनिधी : हातपाटी वाळू व्यवसायासाठी सावित्री खाडीसह जिल्ह्यातील इतर नद्यांमधील सर्व गट तत्काळ खुले करून देण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिले. प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सावित्री खाडीसह रायगड जिल्ह्यातील पारंपरिक हातपाटीने वाळू …
Read More »अॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस
पनवेल : महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांनी वृषाली वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका सुशिला घरत, मुग्धा लोंढे, प्रभाग क्रमांक 17 …
Read More »कारागृहातील पोलिसाला कैद्याच्या भावाची मारहाण
पनवेल ः बातमीदार तळोजा कारागृहात प्रवेश करण्यासाठी एका कैद्याच्या नातेवाइकाने तळोजा कारागृहाच्या मुख्य दरवाजावर कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिरोज हनीफ शेख (45) असे या आरोपीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी …
Read More »जमिनीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
पनवेल ः बातमीदार बदलापूर येथे कर्जत रोडला पेट्रोलपंपासमोर 4 गुंठे जागा 25 लाख रुपयांत देतो, असे सांगून 50 वर्षीय इसमाकडून सहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. दत्तात्रय दामोदर पाटील असे फिर्यादीचे नाव असून ते घोट येथील रहिवासी आहेत. आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय दामोदर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper