पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर गाडी सोडली माणगाव ः प्रतिनिधी या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी (दि. 6) चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. माणगांव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी व रेल्वेचे दार न उघडल्याने अनेकांना आरक्षण असूनही रेल्वेमध्ये …
Read More »डॉ. बबन जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार एसएमडीएल. कॉलेजचे प्रो. डॉ. बबन भिवसेन जाधव यांना देण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते पाच हजार रु. पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय त्यांना ज्ञानज्योती संस्थेचा ज्ञानभूषण पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. जाधव यांनी आदर्श शिक्षकाच्या …
Read More »उरण महाविद्यालयात फूड फेस्टिवल उत्साहात
उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य, कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने अन्नपूर्णा योजनेंतर्गत फूड फेस्टिवल आयोजित केला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते या फूड फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, व्यवसायाला लागणारे भांडवल व त्यातून कशा पद्धतीने नफा …
Read More »साई विभागातील ग्रामस्थ शिवसेना शिंदे गटात दाखल
माणगाव ः प्रतिनिधी साई विभागातील साई कोंड, विहुले व काकल गावातील तसेच आमडोशी व सुरव गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मंगळवारी (दि. 6) शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेना नेते अॅड. राजीव …
Read More »पेणमधील बेकरीवर कारवाईचे आदेश
पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेकर्यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.पेण येथील अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळली. …
Read More »पनवेल, उरणमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप
पनवेल : रामप्रहर वृत्त लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. 5) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बप्पा विराजमान झाला होता. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपुर्ण वातावरणात विर्सजन …
Read More »उरणमध्ये मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट
उरण : वार्ताहर उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब …
Read More »चौक तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ पुन्हा अपघात; दोघे ठार, 10 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमध्ये वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये या उद्देशाने विहंगम योग सेवा सत्संग आणि राष्ट्रीय एकता मंचने देशभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत खारघर सेक्टर 35 येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत व हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper