महाड : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने तालुक्यातील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्यातील औषधांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यांत अधिकारी व कर्मचार्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी महाड तालुक्यातील पशूधन पालकांकडून केली …
Read More »कर्जतमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ; नगर परिषदेकडून सर्वेक्षण सुरू
कर्जत : बातमीदार नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये कर्जत शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सर्व भागात फिरून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहे. दरम्यान, नगर परिषदेतर्फे शहरात औषध फवारणी सुरु करण्यात आहे. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून नगर परिषदेला देण्यात …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण
मॉस्को : वृत्तसंस्था महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साठे यांचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण मंगळवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटले की, रशियात भारतीय संस्कृती …
Read More »माथेरानच्या मिनीट्रेनला पर्यटकांची पसंती
पाच महिन्यांत दीड लाख प्रवाशांनी केली सफर मध्य रेल्वेच्या तिजोरीत एक कोटीहून अधिक उत्पन्न मुंबई : प्रतिनिधी पर्यटकांचे आकर्षण आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल …
Read More »अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा
आमदार महेश बालदी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड-भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे …
Read More »‘वेदांता-फॉक्सकॉन’चा प्रकल्प मविआ सरकारमुळे गुजरातमध्ये
मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधी वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प पूर्वी सत्तेत असणार्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. वेदांता समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या भागीदारीतून होऊ घातलेल्या एक लाख 66 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये साकारणार …
Read More »विरोधकांची कोल्हेकुई
वेदांत समुह आणि फॉक्सकॉन या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या संयुक्त प्रकल्पाला अखेर गुजरातने आपल्याकडे ओढले. त्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या महाप्रकल्पाला जे लोक राष्ट्रीय पुनर्उभारणीचा भाग मानतात त्यांनी आनंद व्यक्त केला, तर काही असंतुष्ट विरोधकांनी त्याबाबत नेहमीप्रमाणे राजकारण करण्याचा डाव साधला. वेदांत समुह ही मोठी भारतीय कंपनी असून …
Read More »बाप्पाच्या दर्शनासाठी महडमध्ये भक्तांचा महापूर
खोपोली : प्रतिनिधी गणेशोत्सवानंतर लगेच आलेल्या अंगारक योग निमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 13) भक्तांनी गर्दी केली होती. पहाटे महाआरती झाल्यापासून लागलेल्या भाविकांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्या. अंगारकी चतुर्थीनिमित्त महड मंदिर सभामंडपात विविध फुले वापरून साकारलेली आकर्षक रांगोळी, फुलांची आरास व मन प्रसन्न होईल अशी …
Read More »रायगडात ठिकठिकाणी साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना
पेण : प्रतिनिधी गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि. 13) पहिल्या संकष्टी चतुर्थीला पेण तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती साखरचौथ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पेणमध्ये मोठ्या उत्साहात साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंगळवारी सकाळी मिरवणुकीने सारखचौथ गणपतीचे आगमन होऊन विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंडळातर्फे आयोजन …
Read More »रायगड जिल्हा परिषदेचा कारभार होतोय हायटेक
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक होत असून जिल्हा परिषदेने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी तसेच पाणीपट्टी वसुली करणे तसेच त्याची नोंद ठेवणे सुलभ झाले आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper