Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेण वाक्रुळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पेण : प्रतिनिधी स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग आणि जेएसडब्ल्यूू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाक्रुळ येथील वाकेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 190 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ पाटील, वाक्रुळ सरपंच गणेश गायकर, शेतकरी कुकुटपालन …

Read More »

पेणचे राजू पिचिका शांतता कमिटीच्या सदस्यपदी नियुक्त

पेण : प्रतिनिधी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत पेण येथील उद्योजक राजू पिचिका यांची शांतात कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गणेशोत्सव …

Read More »

खोपोलीत 210 किलो गांजा जप्त

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीतील लौजीजवळ एका झायलो गाडीतून 210 किलो गांजा जप्त करण्यात आला. पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गुरुवारी कारवाई ही रात्री करण्यात आली. जप्त केलेल्या गाजांची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पुण्याकडून मुंबई गोवंडीकडे झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती …

Read More »

खोपोलीतील स्वागत कमानीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

खालापूर : प्रतिनिधी शहराच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आलेली स्वागत कमान मधोमध वाकली असून कमानीवर बसवलेल्या लाद्या व शोभेच्या वस्तू  खिळखिळ्या होऊन जमीनीवर कोसळत आहेत. या कमानीवरील दोन लाद्या गुरुवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता खाली रस्त्यावर कोसळल्या. खोपोली नगर परिषदेने 25 लाख रुपये खर्चून 10 वर्षा पुर्वी खोपोली शहराच्या प्रवेद्वारावर स्वागत …

Read More »

जीवनविद्या मिशनकडून भिवपुरी गावात वृक्षारोपण

कर्जत : बातमीदार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनच्या डोंबिवली शाखेने ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या कर्जत तालुक्यातील भिवपूरी या गावात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगताना ’पर्यावरण हाच नारायण’ असा दिव्य विचार दिला आहे. जीवनविद्या मिशन ही संस्था 2022-2023 हे वर्ष श्री …

Read More »

मुरूड, रोह्यात भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच सध्या कडक ऊन पडत असल्याने मुरूड तालुक्यातील भातपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, भातपिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील …

Read More »

रायगड रोपवे सहा दिवस बंद राहणार

महाड : प्रतिनिधी शिवप्रेमींना किल्ले रायगडावर केवळ चारच मिनिटांत घेऊन जाणार्‍या रायगड रोप वेची सेवा 5 ते 10 सप्टेंबर या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड रोप वेचे व्यवस्थापक सतीश माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. किल्ले रायगडवर जाण्यासाठी रोप वेची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान …

Read More »

विराट कोहली झाला अलिबागकर!

झिराड परिसरात खरेदी केला भूखंड; फार्महाऊस बांधणार अलिबाग # प्रतिनिधी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही आठ एकर हवेशीर जागा असून या ठिकाणी तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. 30) पूर्ण केला. …

Read More »

एमजीएममधील जन आरोग्य योजना पूर्ववत सुरू

आमदार प्रशांत ठाकूर व माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवरून कामोठे एमजीएम रुग्णालय निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा लाभ या ठिकाणच्या रुग्णांना मिळत नव्हता. सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी येथे योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर …

Read More »

‘आयएनएस विक्रांत’ नौदलाच्या ताफ्यात

पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलावतरण कोची : वृत्तसंस्था संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी (दि. 2) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोचीमध्ये हा सोहळा झाला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे आयएनएस विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी विक्रांत युद्धनौका म्हणजे …

Read More »