Breaking News

महत्वाच्या बातम्या

स्वच्छतागृहांची माहिती देणार अॅप

पनवेल महापालिकेच्या स्वच्छता हर कदम मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी स्वच्छतागृहांची माहिती देणारे ’स्वच्छता हर कदम’ या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) मुख्यालयात करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून हे अ‍ॅप व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे. स्टार्टअप …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात डीएलएलई प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 26) लाईफ लाँग लर्निंग अ‍ॅण्ड एक्सटेशन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे डीएलएलईचा प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी डीएलएलई मुंबई विद्यापीठचे अध्यक्ष डॉ.कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच …

Read More »

गव्हाण विद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

गव्हाण ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिथीप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम इ. 8वी ब वर्गाने आयोजित केला. …

Read More »

उत्साही सिडको कर्मचार्यांचा भीमाशंकर ट्रेक

पनवेल ः रामप्रहर वृत्त सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात सिडको एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अध्यक्ष विनोद पाटील यांच्या संकल्पनेतून ट्रेकसाठी इच्छुक असणार्‍यांसाठी श्री भीमाशंकर येथे ट्रेकिंगचे आयोजन केले जाते. एकूण 45 कर्मचार्‍यांनी भीमाशंकर ट्रेकला जाण्यासाठी आपली नावे नोंदवली होती. 21 ऑगस्ट रोजी ट्रेकर्ससाठी सिडकोचे नाव व सिडकोचा लोगो असलेले, तसेच यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याच्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात कर्करोगविषयी व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूट यांच्या समन्वयाने तंबाखूसंबंधी कर्करोगविषयी जागृतीपर अतिथी व्याख्यान शुक्रवारी (दि. 26) झाले. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे टाटा मेमोरिअल सेंटरचे कॅन्सर रिसर्च इंस्टीटयूटच्या वैज्ञानिक …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने शुक्रवारी (दि. 26) तालुक्यातील कोन, सावळा रोड सोमटणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथकाने रंगीत तालीम केली. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आगामी गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने कोन, सावळा, रोड सोमटणे येथे दंगा काबू पथकातर्फे रंगीत तालीमचे …

Read More »

शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालावी

भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार वाशी विभागातील सेक्टर 9 व 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार्‍या कामामुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या विभागात नवी मुंबईतील शाळा, कॉलेज व हॉस्पिटलही आहे, मात्र ऐन शाळेच्या वेळी या …

Read More »

गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!

भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने …

Read More »

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार -ना. रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे …

Read More »