Breaking News

महत्वाच्या बातम्या

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी

तेरा जण जखमी खोपोली : प्रतिनिधी भरधाव वेगाने जाणारा टेम्पो वळणावर नियंत्रित न झाल्याने पलटी होवून, तेरा जण जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील लोधिवली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 29) सकाळी घडली. टेम्पो (एमएच-04,एफडी-9977) गुरुवारी सकाळी पनवेलहून खोपोलीच्या दिशेने मजूरांना घेऊन निघाला होता. खालापूर हद्दीत लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर एका वळणावर …

Read More »

जिल्ह्यातील धोकादायक इमारतीबाबत ठोस भूमिका हवी

रायगड जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार  जिल्ह्यात 639 इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी 96 इमारती अतिधोकादायक आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता पनवेलमध्ये प्रमाण अधिक आहे. अलिबागमध्ये 26 इमारती अतिधोकादायक आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुबईतील कुर्ला येथे धोाकादायक इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी महाड शहातीली इमारत कोसळली होती. त्यातही अनेकांना प्राण …

Read More »

नेरूळमधील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे न्यायालयाचे आदेश

भाजप नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 19ए मधील अडीच एकर भूखंडावर कब्जा करून तिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम, गोडाऊन, गॅरेज सर्व्हिस सेंटर थाटले होते. या जागेवर नवी मुंबई मनपाने दावा केला होता. अखेर न्यायालयीन लढाई नवी मुंबई मनपाने जिंकली असून मूळ गोठा ठेऊन उर्वरित अनधिकृत बांधकाम …

Read More »

पोसरी येथे शेतकरी संवाद आणि आदिवासी प्रशिक्षण दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेती याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रवर्तक प्रिती बोराडे यांनी क्रॉपसॅप …

Read More »

रंजना गायकवाड यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

पनवेल : वार्ताहर सामाजिक कार्यकर्त्या आणि तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असणार्‍या मुंबईमधील रंजना गायकवाड यांची ऑल इंडिया सिफेरस या आंतराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल राजकीय सामाजिक सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या वेळी युनियनचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे …

Read More »

नियमित व्यायाम, योग्य आहार जीवनाचा अविभाज्य भाग -डॉ. सोनल पुरोहित

पनवेल : वार्ताहर पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करीत असाल असे असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन लाईफ स्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉ. सोनल पुरोहित यांनी खांदा कॉलनी येथे केले. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी …

Read More »

बुलेटच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण; लोक त्रस्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बुलेटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत असून दुचाकीचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे, मात्र या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणार्‍या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहन चालविताना वाहनांमधून किमान 50 डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात …

Read More »

हिवताप, डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारी

नवी मुंबई महापालिकेने शोधली 496 दूषित स्थाने नवी मुंबई : बातमीदार पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याविषयी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असते. यामधील सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य …

Read More »

अखेर विमानतळाला मिळणार दि. बा. पाटलांचे नाव

कृती समिती आणि भूमीपुत्रांच्या लढाईला मोठे यश पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमीपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या …

Read More »

भाजप सांस्कृतिक सेलच्या नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहराच्या भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 29) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या. रुद्रतेज शेटे, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ सोमण, श्रेयस वाणी, सिद्धार्थ जोशी, शुभम साळवी, भूषण पाटील, साहिल शिंदे, साक्षी म्हात्रे, छायल भारंबे, प्रांजल आढाव, विजय नालंकर, ऋषिकेश जैतपाल, …

Read More »