लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण उरण : बातमीदार उरण तालुक्यातील धुतूम गावात ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984च्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण सोमवारी (दि. 27) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »आमदार महेंद्र दळवी समर्थकांचे अलिबागमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन
अलिबाग : प्रतिनिधी मंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 28) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याद्वारे आमदार दळवी यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अलिबागमधील चेंढरे येथे झालेल्या या मेळाव्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा …
Read More »मुंबईत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, 17 जण जखमी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची एक इमारत सोमवारी (दि. 28) रात्री कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक …
Read More »राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरेंना उपरती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव देण्यास तोंडी सहमती लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती आणि भूमिपुत्रांच्या संघर्षाला यश पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास …
Read More »पनवेलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; प्रजापती विकास मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्रजापती विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 26) पनवेलमधील मिरची गल्ली येथील संत गोरा कुंभार मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. पनवेलमधील गरीब व गरजू अशा बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये वॉटर बॉटल, नोटबुक, पेन, पेन्सिल, पाऊच आदी …
Read More »शामेलियन सरड्याला जीवदान
बच्चेकंपनीने कावळ्यांच्या तावडीतून केली सुटका उरण : वार्ताहर कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या दुर्मीळ अशा शामेलियन जातीच्या सरड्याची बच्चेकंपनीने सुटका करून त्याला जीवदान दिले आहे. चिरनेर येथील आयुष भगत, दक्ष भगत, हर्दिका गोंधळी, स्मीत गोंधळी हे अंगणात खेळत असताना त्यांना कावळ्यांचा गोंगाट ऐकू आला म्हणून ते पहाण्यासाठी गेले असता त्यांना एक विचित्र …
Read More »राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात झाली. या निमित्ताने महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. पवार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. …
Read More »गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज बहुजनोद्धारक आणि अलौकिक प्रतिभेचे धनी तसेच प्रजाहितदक्ष लोकराजा होते असे प्रतिपादन केले. विद्यालयाच्या …
Read More »उरण महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे सामाजिक न्याय दिन
उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन व राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. आभासी ऑनलाइन माध्यमातून सामाजिक न्यायदिन आयोजित केला गेला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर. एस. कोंडेकर (इतिहास विभागप्रमुख, राजिव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि. नांदेड) …
Read More »पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर
माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार जीवन विद्या मशीन आणि एम्बिशन ट्युटोरिअल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper