पनवेल : रामप्रहर वृत्त अंधेरी येथे झालेल्या इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षा 2019मध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मैथिली नारायण फडके हिने सुवर्ण कामगिरी करीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला. मैथिली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी असून या स्पर्धा परीक्षेसाठी सीकेटीतील पहिली ते …
Read More »पूरपरिस्थितीमुळे डुंगी ग्रामस्थांमध्ये चोरांची भीती
पनवेल : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या …
Read More »तहसील कार्यालयासमोर होतेय वाहतूक कोंडी
पनवेल : बातमीदार साईनगर येथील तहसील कार्यालयासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक चारचाकी वाहने अस्तावस्त पार्क करत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तहसील कार्यालय व शहर पोलीस स्टेशन यामुळे साईनगर परिसर नेहमी गजबजलेला असतो. नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ सुरू असते. येथे वाहने कशीही पार्क करत …
Read More »एटीएममध्ये स्कीमर, छुपा कॅमेरा
पनवेल : बातमीदार – एटीएमद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी येणार्या नागरिकांची माहिती चोरण्याच्या उद्देशाने दोघा नायजेरियन नागरिकांनी तळोजा पाचनंद येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या एटीएममध्ये कार्ड रिडरवर स्कीमर डिवाइस व एटीएम कीबोर्डच्या वरील बाजूस कॅमेरा डिवाइस लावल्याचे उघडकीस आले आहे. या एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीवरून हा प्रकार उघडकीस आला असून तळोजा …
Read More »खाजगी बसेसमुळे रहदारीला अडथळा
सबंधितांवर कारवाईची तेजस कांडपिळे यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी – पनवेल रेल्वेस्थानक ते तक्का या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाजगी बसेस उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतूक व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रभाग समिती ड चे सभापती तेजस कांडपिळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल शहर …
Read More »ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीच्या नवनिर्वाचित सरपंच रिया कोंडिलकर यांना शुभेच्छा
पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे नवनिर्वाचित सरपंच रिया रवींद्र कोंडिलकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांना विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य अजय तेजे, माजी सरपंच योगेश लहाने, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, महिला अध्यक्षा शिल्पा म्हात्रे, प्रवीण काळबागे, कालुराम माळी, कृष्णा कोंडिलकर, …
Read More »मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस
पनवेल : भाजपच्या मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोनाली गायकवाड हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रणाली नाईक, सोनाली खंडागळे उपस्थित होत्या.
Read More »शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनमधून जंकफूड होणार हद्दपार
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज कॅन्टिनमधून जंकफूड हद्दपार होणार आहे. त्याच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याने अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जंकफूडमध्ये साखर, मीठ व मैद्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे …
Read More »आरोग्यदूतांचा रविवारी सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्या व इतर रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 1 जुलै हा दिवस सर्व …
Read More »शेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (5 जुलै) सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा समारंभ होणार असून, या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper