उरण : बातमीदार तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी रात्री 8 वाजता झालेल्या अपघातात निखिल चंद्रकांत कडू (21) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन दिवसातील हा चौथा अपघात. यामध्ये चार जणांचा बळी गेला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अपघात मालिकेमध्ये मंगळवारी चौथा बळी गेला आहे. …
Read More »चि. तेजस कांडपिळे आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शुभविवाह
पनवेल : महानगरपालिकेचे नगरसेवक चि. तेजस कांडपिळे आणि चि. सौ. कां. ऐश्वर्या यांचा शुभविवाह आयुष रिसॉर्ट, शेडुंग येथे मंगळवारी झाला. या वेळी वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते.
Read More »सुदेश दळवी यांना पुरस्कार प्रदान
पनवेल : येथील उद्योजक दलितमित्र सुदेश दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने नुकताच श्रमरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पनवेलमधील शासकीय अध्यापक महाविद्यालयात झालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात राज्याच्या सांस्कृतिक विभागातील कक्ष अधिकारी बाळासाहेब सावंत यांच्या हस्ते दळवी यांना श्रमरत्न सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. अबरार मास्टर यांची नियुक्ती …
Read More »पनवेल टपाल कार्यालय नव्या जागेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलमध्ये स्थलांतर पनवेल : प्रतिनिधी पनवेल टपाल कार्यालय पनवेल शहरातील शिवाजी चौकजवळील स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात येत्या आठवड्यात पूर्णपणे कार्यरत होणार आहे. पनवेल शहर पोस्ट कार्यालय पनवेलमध्ये राहावे, यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न …
Read More »मराठी उद्योजकाचे सुवर्ण क्षेत्रात पाऊल हे गौरवास्पद -रमेश चव्हाण
पनवेल ः रामप्रहर वृत्त : पनवेल मिरची गल्ली येथील पोेतदार ज्वेलर्सचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. आज लाचलुचपत खात्याचे उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी पोतदार ज्वेलर्सला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छापर भेटीत बोलताना उपअधीक्षक रमेश चव्हाण म्हणाले की, मराठी उद्योजकाने सुवर्ण क्षेत्रात पाऊल टाकणे हे अतिशय गौरवास्पद आहे. मेहनत आणि जिद्दीच्या …
Read More »खाडी किनारी डेब्रिजचे ढीग
नवी मुंबई : बातमीदार : सायन पनवेल महमार्गालगत असलेल्या खारघर येथील खाडीकिनारी डेब्रिज रिते केले जात आहे. सध्या खारघर शहराचा विकास हा खाडीकिनार्यापर्यंत पोहोचलेला आहे. पनवेल येथून मुंबईच्या दिशेने जाणार्या बाजूला अनेक बांधकामे होत आहेत. कांदळवनांचा हा भाग असलेल्या परिसरात खारघर स्थानकापर्यंत बांधकामे पोहोचलेली आहेत, मात्र या बांधकामांचे निमित्त साधत …
Read More »24 मेपासून जेएनपीटी बेमुदत बंद
दिनेश पाटील यांनी दिला इशारा उरण : प्रतिनिधी : जेएनपीटी कामगार एकता संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन, न्हावाशेवा पोर्ट अॅण्ड जनरल वर्कर्स युनियन, जेएनपीटी जनरल कामगार संघटना, महाराष्ट्र संघटित-असंघटित कामगार सभा, तसेच जेएनपीटी बंदरात कार्यरत असणार्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने जेएनपीटी कामगार संघर्ष कृती समिती बनविण्यात आली असून, या कृती …
Read More »पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चिताज सुपरकिंग्ज विजेता
पनवेल : प्रतिनिधी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकेडमीच्या वतीने झालेल्या 23 वर्षाखालील पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेत चिताज सुपर किंग्ज संघ अंतिम विजेता ठरला. ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर पनवेल येथील महात्मा फुले आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या भव्य क्रीडांगणावर झाली. स्पर्धेत लावाज रॉयल्स, चिताज सुपरकिंग्ज, शामशेठ सुपरकिंग्ज, हायरीच सुपरस्ट्रायकर्स, विराज सुपरकिंग्ज, शिवम …
Read More »विवाहिता बेपत्ता
पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात असलेली एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याने तिचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. अंशुकुमारी रूपेशकुमार लाल (38, रा. बीटीसी कंपनी, प्लॉट नं. 17/3, तळोजा एमआयडीसी) हिची उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक लांब असून तिच्या अंगात हिरव्या रंगाची साडी व …
Read More »अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करणार्या एका टेलरला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथे टेलर काम करणारा राजेश त्रिभुवन सिंग (29) याने त्याच्या दुकानाजवळील असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून दुकानाचे शटर खाली खेचून अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper