पनवेल : वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाण घेवाण करीत महाराजांचे आचार विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी राहिलेली चळवळ म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरू केलेली राजे प्रतिष्ठान संस्था. या संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या 2 जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या …
Read More »जेएनपीटी कामगारांचा नियोजित संप स्थगित
उरण : बातमीदार जेएनपीटी व्यवस्थापनाविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटनानी दिलेल्या संपाच्या नोटिशीची दखल घेऊन आज जेएनपीटी व्यवस्थापन व पाचही कामगार संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या वेळी सध्याच्या परिस्थितीतीमध्ये कोणताही बदल न करता कामगार संघटनांशी चर्चा करून नोटिसीमधील मागण्यांवर तडजोड घडवून …
Read More »पनवेल कार्यालयात विद्युत मीटरचा तुटवडा
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. महावितरणच्या …
Read More »पुनर्वसनाशिवाय शहरात झोपड्यांना हात लावणार नाही ; पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भूमिका
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांमधील व्यवसायिकांना नोटिसा देऊन दुकाने रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्वसन केल्याशिवाय एकाही झोपडीला हात लावणार नाही, अशी माहिती बुधवारी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांना दिलेल्या नोटिशींमुळे सध्या झोपडपट्टी संघटना निवेदने देऊन कारवाईला विरोध …
Read More »दानपेटी चोरट्यास रंगेहाथ पकडले
पनवेल ः प्रतिनिधी बेलपाड्यातील मंदिरातील दानपेटी चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या चोराचे नाव झाकीर हुशेन कुरेशी असून, तो तुर्भे येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतो. खारघर सेक्टर तीन बेलपाडा गावात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास केली होती. ग्रामस्थांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांकडे …
Read More »बांधकामे अनधिकृत असल्यानेच कारवाई -सिडको
बेलापूर ः कोल्ही-कोपर येथील घरे बेकायदेशीर असल्याची पूर्वकल्पना देऊनही सदर अनधिकृत घरे निष्कासित न केल्यामुळे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. सदर 30 एकर जागा 1967 साली पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची होती. दरम्यानच्या काळात नवी मुंबई विमानतळाची घोषणा झाल्यावर मुख्य गाभा क्षेत्रात असलेली ही जागा 2012मध्ये राज्य …
Read More »संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मांदियाळी
उरण : वार्ताहर संकष्टी चतुर्थी बुधवारी (दि. 22) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपतीची मूर्ती पुरातन काळातील असल्याने व सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वीची मूर्ती असल्याने या मूर्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिरातील आतील गाभारा अतिशय सुंदर असून …
Read More »नवी मुंबईत गरीब रुग्णांचे हाल
नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी येथील मनपा रुग्णालयाचे तीनतेरा वाजल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांचे हाल होत आहेत.विशेष म्हणजे उपचार घेण्यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्वरित प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी लेखी मागणी वाशी रुग्णालयात आर्थिक …
Read More »तांब्या-पितळेच्या भांड्यांना वाढली मागणी
उरण : वार्ताहर 40 ते 45 वर्षापूर्वी घराघरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जात असत. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रांत कमालीचा बदल झाला. त्याचप्रमाणे स्वस्त मिळणार्या आणि सहज स्वच्छ होणार्या चमकदार स्टील भांड्यांचे राज्य स्वयंपाक घरात सुरू झाले होते, पण या भांड्यांचे आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या असलेले फायदे लक्षात आल्याने गृहिणी पुन्हा तांब्याची भांडी वापरू …
Read More »खोबरेल तेल भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पनवेल : रामप्रहर वृत्त सुट्टे खोबरेल तेल भेसळीसाठी चर्चेत असणे सुरूच आहे. या वेळी कोचिन ऑईल मर्चंट्स असोसिएशनने (सीओएमए) सुट्ट्या खोबरेल तेलातील भेसळीचा हा मुद्दा प्रकाशात आणला आहे. सीओएमएचे अध्यक्ष म्हणाले, खोबरेल तेलात सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने काढलेल्या तेलाची मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्यात येत आहे. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट्स औद्योगिक कारणासाठी तेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper