पनवेल ः रामप्रहर वृत्त भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती. त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांनी इतर …
Read More »उरण पालिकेकडून निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य तलावात न टाकता गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती. नगर परिषदेने विमला आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे. यासाठी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका …
Read More »खारघरमध्ये स्कूल बसला आग
विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला पनवेल : वार्ताहर खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना …
Read More »खारघरमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक …
Read More »पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन अभियान
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली. मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक …
Read More »ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती रॅली
पनवेलमध्ये महिलांसाठी ‘रोटरी’चा उपक्रम पनवेल ः वार्ताहर येथील रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लबच्या वतीने पनवेलमध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. अर्चना परेश ठाकूर यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. या उपक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्ष ध्वनी तन्ना, मेन्टोर क्लबचे हर्मेश तन्ना, सिम्पल आचालिया, …
Read More »पनवेलमध्ये महाविकास आघाडीला लागली गळती
राष्ट्रवादी, शेकापच्या पदाधिकार्यांचा समर्थकांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश पनवेल ः वार्ताहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील अर्जुन डांगे यांनी रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. शिवसेना नेते …
Read More »भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन
पनवेल : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्वाचा असेल, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्च्याच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि …
Read More »पनवेलकरांना घडणार लालबागचा राजाचे दर्शन
महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा गौरा गणेशोत्सव पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलकरांना लालबागचा राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागचा राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी (दि. 13) विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 30वे वर्ष आहे. पनवेलमधील महात्मा …
Read More »पनवेलमध्ये गणेश विसर्जनावेळी शॉक लागून 11 जण जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील कोळीवाडा विसर्जन घाटावर शुक्रवारी (दि. 10) रात्री लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना 11 जणांना विजेचा शॉक लागला. जखमींना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य नेते तसेच पोलिसांनी व महापालिकेच्या अधिकार्यांनी रुग्णालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper