Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन सोमवारी (दि. 21) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »

फसवणूकप्रकरणी पनवेल शेकाप उपाध्यक्ष अब्दुल कच्छी गुजरात पोलिसांच्या ताब्यात

पनवेल ः वार्ताहर शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी यांना गुजरात राज्यातील पोलिसांनी फसवणूकप्रकरणी पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (44)  यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा 420, 120 बीसह आयटी अ‍ॅक्ट …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी उरणमध्येही बैठक

उरण ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार व यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली उरण  तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालयात शनिवारी (दि. …

Read More »

सिडकोवर धडकणार लाखो ‘दिबा’प्रेमी; 24 जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या भव्य व आदर्श मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधून वाहवा मिळवली. आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 24 जूनला सिडकोवर लाखो ‘दिबा’प्रेमी धडक देणार आहेत.  त्या अनुषंगाने …

Read More »

एमएमआरडीएच्या लोह व स्टील मार्केट समितीवर बबन मुकादम

पनवेल ः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लोह व स्टील मार्केट समितीवर पनवेल महापालिकेचे कळंबोली येथील नगरसेवक बबन मुकादम यांच्या निवडीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. या वेळी नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि. 18) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या …

Read More »

24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जय्यत तयारी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकांचा धडाका

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळी आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगाने सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल तालुक्यातील आकुर्ली, रिटघर, वाकडी …

Read More »

सिडकोने घेतलेले सेवा शुल्क पनवेल महापालिका करणार परत; आयुक्तांच्या ग्वाहीमुळे नागरिकांना मिळणार दिलासा

पनवेल ः प्रतिनिधी सिडको हद्दीतील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी  महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 17) महापालिका आयुक्तांकडे केली. या वेळी सिडको वसाहतींतील नागरिकांच्या मालमत्ता करातून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क …

Read More »

पनवेलमध्ये रस्त्यांची डागडुजी; नगरसेवक राजू सोनी यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारांच्या झाकणांची दुरूस्ती तसेच महानगरपालिकेसमोरील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्याला पडलेले खड्डे भरून घेतले आहेत. पनवेल शहरातील लाइन आळी येथील हनुमान मंदिराजवळील गटारावरील झाकण गटाराच्या आत गेले होते. त्यामुळे येथून ये जा करणार्‍या लोकांना याचा त्रास होत …

Read More »

तळोजातील दफनविधी त्वरित सुरू करा; नगरसेवक विक्रांत पाटील यांची मागणी

पनवेल : वार्ताहर तळोजा फेज-1 येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडावर दफनविधी त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची बहुजन वंचित विकास संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह भेट घेतली. या वेळी दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाविषयी विस्तृत चर्चा झाली …

Read More »

द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत ढासळली

उरण : वार्ताहर              रायगड जिह्यातील उरण येथील ऐतिहासिक किल्ले द्रोणागिरीचे प्रवेशद्वाराची भिंत आणि चर्चवरील भाग 13 जून रोजी ढासळला. ही घटना अत्यंत गंभीर असून असे होत राहिले तर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर होण्याची भीती आहे. द्रोणागिरी किल्ला हा असंरक्षित स्मारक आहे. किल्ल्यावर जाणार्‍या वाटा पावसाळ्यात बिकट होत आहेत. …

Read More »