पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी शनिवारी (दि. 20) भेट देत नागरिकांना देण्यात येणार्या कोरोना प्रतिबंधक लसींची व साठवणुकीची माहिती घेतली, तसेच लस घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला.केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 मार्चपासून पनवेल महापालिका …
Read More »उरणमध्ये महावितरणची वीज बिल वसुली
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती व सार्वजनिक वीज बिलांपोटी असलेल्या सुमारे 16 कोटींच्या थकीत रकमेपैकी मार्चपर्यंत सक्तीच्या वसुलीनंतरही फक्त पाच कोटींची वसुली करण्यात उरण महावितरणला यश आले, तर वीजचोरीची 213 प्रकरणे उघडकीस आली आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतर उरण महावितरणचे उपअभियंता हरिदास चोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात थकीत वीज बिल …
Read More »नवीन पोसरीतील एलइडी हायमास्टसह पोल गायब
मोहोपाडा ः प्रतिनिधी पंचायत समितीच्या निधीतून वासांबे मोहोपाडा हद्दीतील नवीन पोसरी येथील माऊली अपार्टमेंटनजीकच्या चौकातील एलएडी लाइट हायमास्ट पोलसह गायब झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. असा प्रकार करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. रसायनीतील वासांबे मोहोपाडा व नवीन पोसरी परिसरातील मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहेत. नवीन पोसरी …
Read More »चांभार्लीतील रेगे हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा
मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून शासनाकडून खासगी रुग्णालयांमधूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा विभागात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याचे दिसून येते. आसपासच्या परिसरातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी चांभार्ली येथील संपूर्ण रेगे हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा मंगळवारपासून (दि. 23) सुरू होणार असल्याचे रेगे …
Read More »उरणमध्ये मास्क न लावणार्यांना दंड
नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) राजपाल नाका येथे नगरपरिषदेने तोंडाला मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. उरण नगर परिषदेने धडक कारवाई करत विनामास्क …
Read More »पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा …
Read More »धुतूम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; सरपंच व ग्रामसेवकावर विरोधकांचे शरसंधान
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची …
Read More »चिंध्रण येथे विविध विकासकामांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हा ओबीसी संघटनचे अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मैदानी सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व स्मशानभूमी येथील रस्त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …
Read More »जैवविविधता व्यस्थापनामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, उपयोजन करता येईल
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपीबीआरमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात येणारे घटक जसे शेतकीय जैवविविधता, वन्य जैवविविधता, नागरी जैवविविधता, वनौषधी, वैदू-वैद्य या विषयीच्या नोंदवहीचा भविष्यात नक्कीच उपयोग होणार असून, यानिमित्ताने पनवेल हद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व उपयोजन करता येईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »कोशिश फाऊंडेशनतर्फे स्नॅपशॉट्स फोटोग्राफी स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने स्नॅपशॉटस फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरुपात व खुल्या गटात तसेच पनवेल महापालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा असून, प्रगतशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार विषयांवर आधारित आहे. स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 30 हजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper