Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कामोठ्यात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुबाडले

पनवेल : वार्ताहर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66)  आणि …

Read More »

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात महाविकासपर्व

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून 30 कोटींच्या कामांना महापालिकेची मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त, प्रतिनिधीपनवेलच्या विकासाचा सातत्याने आलेख उंचावणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका हद्दीतील शहर व ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून …

Read More »

‘राजे’च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून अशा प्रकारची कार्य अपेक्षित आहे असे आवर्जून सांगितले. प्रकाशनाच्या वेळी …

Read More »

पनवेलमध्ये स्त्रियांसाठी समुपदेशन कार्यक्रम

सॅनिटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महिला व बालकल्याण समिती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्त्रियांचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता जाणीव जागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 7) करण्यात आले होते. आद्य क्रांतिवीर …

Read More »

आदिवासीवाडीत दिनदर्शिकांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल-रायगड यांच्या वतीने एचओसी कॉलनी येथील आदिवासीवाडी व सिमरन मोटर्स येथील आदिवासीवाडी येथे वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे नूतनवर्षाच्या दिनदर्शिकांचे वाटप  करण्यात आले. या वेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा पनवेल शहर मंडलचे …

Read More »

भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते तसेच विविध मान्यवरांकडून उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र यंदा कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन प्रत्यक्ष भेटीसाठी न येण्याची सूचना केली आहे. तुमच्या शुभेच्छांचा मला कायमच आदर असून, …

Read More »

दिशा महिला मंचकडून पत्रकारांचा सन्मान

पनवेल : प्रतिनिधीसमाजात घडणार्‍या सकारात्मक आणि आदर्शवत गोष्टींना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार्‍या आणि त्याचबरोबर कोरोना संकटकाळात जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून सलग वृत्तसंकलन व छायाचित्रण करणार्‍या पत्रकार व छायाचित्रकारांचा कामोठे येथील दिशा महिला मंचने मंगळवारी (दि. 5) पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. यामध्ये ‘राम प्रहर’चे पत्रकार …

Read More »

‘त्या’ बलात्कार्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; बौद्धजन पंचायत समितीचे उरण पोलिसांना निवेदन

उरण : वार्ताहर पेण हद्दीतील आदिवासी समाजाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली. अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 यांनी बुधवारी (दि.6) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना दिले. निवेदनात असे नमूद केले आहे की, पेण हददीतील आदिवासी समाजाच्या …

Read More »

शिक्षकांचा सत्कार; क्रांतिज्योती महिला विकास फाऊंडेशनचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाची फाऊंडेशनच्या सदस्यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी …

Read More »