पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कामोठे मंडळ युवा मोर्चा तर्फे मायक्का मंदिर से-35 व शिवम कॉम्प्लेक्स समोरचे मैदान जेसीबी डंपरच्या साहाय्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर युवकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी …
Read More »गड्या आपला गाव बरा! : हाताला काम नसल्याने रहिवाशांचा ओढा गावाकडे
पनवेल : बातमीदार गड्या आपला गाव बरा, असे म्हणत अनेक रहिवाशांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे. यासाठी रेल्वे, बस, अथवा खासगी वाहनाची व्यवस्था केली आहे. तर प्रारंभीच्या काळात गावात येऊ नको सांगणारे नातेवाइकही गावी या म्हणून निरोप पाठवीत आहेत. आजूबाजूला दररोज आढळणारे कोरोनाबाधित रुग्ण, शहरात वाढलेली रुग्णसंख्या, उपचारासाठी होणारी तारांबळ, …
Read More »आरोग्य मोहिमेस कळंबोलीत प्रतिसाद
कळंबोली : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा सामाजिक जनजागृती करणारा कार्यक्रम कळंबोलीमध्ये प्रत्यक्षात नागरिकांच्या पसंतीत उतरत आहे. शुक्रवारी (दि. 2) कळंबोलीमधील सोसायट्यांमधून माझे कुटुंब माझे जबाबदारी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने रंगला. कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे पुढाकार महापालिकेतील भाजप नगरसेवक बबन मुकादम यांनी घेतला होता तर या अभियानामध्ये महापालिकेचे …
Read More »बँकेत नोकरीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार, वार्ताहर एचडीएफसी बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून 28 वर्षीय तरुणाची तीन लाख 96 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल येथील विक्रांत विजय देवधर याला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम …
Read More »गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या दोन्ही थोर देशभक्तांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजकुमार चौरे, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ …
Read More »छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेंची विक्रांत पाटील यांनी घेतली भेट
पनवेल : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर ग्रामीण) दौर्या दरम्यान सातार्यात श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले महाराज यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. मनमोकळेपणे आणि मजेशीर वातावरणात महाराजांच्या बरोबर झालेल्या या भेटी बद्दल विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या …
Read More »चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला
भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …
Read More »मराठा समाजाच्या चळवळीला माझा जाहीर पाठिंबा : आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 25 रुग्णांचा मृत्यू; 407 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 1) 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल (मनपा सहा व ग्रामीण सहा) तालुक्यातील 12, खालापूर पाच, उरण दोन, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात 293 नवे कोरोनाबाधित
12 जणांचा मृत्यू; 337 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 1) कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 234 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper