Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बंगाली मिठाईला खवय्यांची पसंती

पनवेल : बातमीदार गणरायाची आराधना करताना नैवद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठायांचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. या बंगाली मिठाईचे भाव 10 टक्क्यांनी वाढले आहे. या मिठायांमध्ये सुका मेवा, वेगवेगळे फ्लेवर्स, पेढ्यापासून काजुकतलीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगाली मिठाईही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. गणपतीचे आवडते खाद्य मोदक …

Read More »

भारतीय जनता पक्षाकडून धरणा कॅम्प येथे अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये मौजे धरणा कॅम्प (करंजावडे) येथे भाजप पदाधिकारी व …

Read More »

सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

खांदेश्वर पोलिसांची धडक कारवाई पनवेल : बातमीदार, वार्ताहर खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. पोलिसांनी यातील तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुकापुर येथील गावदेवी मंदिरातील दानपेटी …

Read More »

पनवेलकरांना ई-पास सक्तीचा

गणेशभक्तांमध्ये संताप COVID e-Pass कळंबोली : बातमीदार गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याचे नियोजन केले असताना अचानकपणे रायगडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन पनवेलमधून रायगडच्या विविध तालुक्यात येणार्‍या गणेशभक्तांना ई-पास ची सक्ती केली आहे. या निर्णयामुळे रायगडच्या गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण  निर्माण झाले आहे. याबाबत शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांच्याशी …

Read More »

पनवेल परिसरात कृत्रिम तलावांची होणार निर्मिती

पनवेल : बातमीदार गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिकेने 41 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हे तलाव 4 बाय 6 फूट लांबी-रुंद आणि चार फूट खोल असतील. नागरिकांनी थेट पाण्यात जाऊन विसर्जन करू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात  येत आहे. तसेच या …

Read More »

पनवेल तालुक्यात 232 नवे कोरोनाग्रस्त

एकाचा मृत्यू; 220 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 21) कोरोनाचे 232 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा  मृत्यू  झाला आहे तर 220 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 165 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 160 रुग्ण बरे …

Read More »

रायगडात 448 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 448 नव्या कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शुक्रवारी (दि. 21) झाली. त्याचबरोबर 401 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 232, अलिबाग 58, पेण 32, खालापूर 29, महाड 20, रोहा 19, कर्जत 16, माणगाव 14, उरण व सुधागड प्रत्येकी …

Read More »

मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण आणण्याच्या …

Read More »

स्वच्छ भारत सर्वेक्षणात पनवेल मनपाची मुसंडी

राज्यात पाचव्या, तर देशात 20व्या स्थानी पनवेल : रामप्रहर वृत्तस्वच्छ भारत सर्वेक्षण 2020मध्ये पनवेल महानगरपालिकेने मुसंडी मारत राज्यात पाचवा, तर देशात 20वा क्रमांक पटकाविला आहे. नवी महापालिका असूनही एवढी जबरदस्त कामगिरी केल्याने कौतुक होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनानुसार पनवेल महापालिकेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर डॉ. …

Read More »

कृष्णजन्म व मातृशक्ती विषयावर ऑनलाइन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने कृष्णाष्टमी आणि मातृदिनानिमित्त ’कृष्णजन्म व मातृशक्ती’ हा ऑनलाइन कार्यक्रम झाला. कल्याण येथील मंजिरी फडके या कार्यक्रमाच्या प्रमख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ’कृष्णजन्म आणि मातृशक्ती’ या विषयावर त्यानी विचार मांडले. या विषयावर भाष्य करताना मातृशक्ती ही एक संकल्पना असल्याचे …

Read More »