पेण ः प्रतिनिधी ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत भाविकांच्या घरी गणरायांचे आगमन झाले. त्यानंतर गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. पेणमध्ये विविध ठिकाणी नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. विसर्जनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले …
Read More »दारूबंदी अधिकार्याचा दारू पिऊन मृत्यू
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकारी याचा बुधवारी (दि. 31) दारूचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. त्यांना नेहमी अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. बुधवारी जास्त …
Read More »दोन अपघातात दोन ठार, दोन जखमी
खोपोली, महाड : प्रतिनिधी खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ बुधवारी (दि. 31)झालेल्या अपघात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला, तर मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि. 1) पहाटे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण जखमी झाले. खोपोली-पेण रस्त्यावर रानसई गावाजवळ वळण रस्त्यावर कंटेनर अनियंत्रित होऊन …
Read More »दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप
अलिबाग : प्रतिनिधी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे बुधवारी घरोघरी आगमन झाले. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रायगड जिल्हयात एक लाखांहून अधिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि चैतन्य सोहळयाला प्रारंभ झाला. दरम्यान दीड दिवसांच्या गणपतींचे गुरूवारी मोठ्या भक्तीभावाने वाजतगाजत विसर्जन करण्यात झाले. घरोघरी बुधवारी सकाळी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात …
Read More »गुडवण पुलाची स्थानिक तरुणांनी केली दुरुस्ती
कर्जत : बातमीदार तालुक्यातील चिल्हार नदीवर असलेल्या गुडवण गावाजवळील पुलावरील डांबर वाहून गेल्याने खड्डेमय रस्त्याने अनेक वर्षे वाहतूक सुरू आहे. त्याबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने गुडवण गावातील तरुणांनी श्रमदान व स्वखर्चाने पुलाची दुरुस्ती केली आहे. कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत …
Read More »पोलादपूर चोळई येथे चोरी; दुचाकी, मोबाइलसह रोख रक्कम लंपास
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथे सोमवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास एका घराबाहेरील दुचाकी, घरातील मोबाइल व रोख रक्कम तसेच बॅकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील बांधकाम व्यवसायीक रोहिदास सदाशिव मोहिते यांच्या घरासमोरील हिरो होण्डा पॅशन …
Read More »माणगावातील शिक्षक कॉलनीत घरफोडी
सोन्याचे मंगळसूत्र घेऊन अज्ञात चोरटा फरार माणगाव : प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोमवारी (दि. 29) सायंकाळी घरातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. विश्वनाथ हुल्लनाईक तालिमकर (वय 52, रा. शिक्षक कॉलनी, दत्तनगर, माणगाव) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा सोमवारी सायंकाळी …
Read More »माणगावात एसटी चालक, वाहकावर गुन्हा
माणगाव : प्रतिनिधी कर्तव्यावर असताना सोमवारी (दि.29) सकाळी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने तसेच शासकीय पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एसटी चालक व वाहकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एसटी बस (एमएच-13,सीयू-8185) चा चालक ज्ञानेश्वर अशोक कापडी (वय 31, सध्या रा. भिवंडी, …
Read More »सागवानी दरवाजांमुळे कुलाबा किल्ल्याच्या सौंदर्यात भर
अलिबाग : प्रतिनिधी मराठा आरमाराचे केंद्र राहिलेल्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याला दोन सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. खार्या पाण्यापासून हे दरवाजे सुरक्षीत रहावेत म्हणून यावर विशेष लेप लावण्यात आला असून या दरवाजांना ऐतिहासीक रुप देताना टोकदार खिळे, लोखंडी पट्ट्यासह चार इंचाच्या सागवानी मजबूत पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून …
Read More »प्रेम प्रकरणात तरुणाने स्वतःला घेतले पेटवून
नागोठणे, पाली : प्रतिनिधी नागोठणे जवळील आंबेघर येथील प्रणय केशव बडे (वय 27) या तरुणाने सोमवारी (दि. 29) संध्याकाळी स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना पालीमध्ये घडली आहे. त्यात तो 90 टक्के भाजल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्रणय याचे पाली येथील प्रिती (वय 26, नाव बदलले आहे) सोबत पाच वर्षापासून प्रेम …
Read More »