Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही -आमदार भरत गोगावले

निजामपूर भागातील विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन माणगाव : प्रतिनिधी तालुक्याच्या निजामपूर भागातील कोस्ते (खुर्द), भागाड, साजे, सणसवाडी, विळे वरचीवाडी, मांजूर्णे येथील नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन शिवसेना (शिंदे गट) विधीमंडळ पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांच्या बाबतीत आमचा नाद कोणी करायचा नाही, असा टोला …

Read More »

एक गाव, एक कुटुंब, एक गणपती!; रोहा पिंगळसई येथील देशमुख तरुण मंडळाची परंपरा

रोहे ः प्रतिनिधी एक गाव, एक कुटुंब, एक गणपती ही संकल्पना जपणारे पिंगळसई (ता. रोहा) येथील देशमुख तरुण मंडळ या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. रोहा तालुक्यातील प्रत्येक गावाने आपले वैशिष्ट्य आजपर्यंत जोपसले आहे. त्यातीलच वारकरी परंपरा रूजवणारे म्हणून ओळख असलेले रोहा तालुक्यातील पिंगळसई येथील देशमुख तरूण मंडळ …

Read More »

पेण वाक्रुळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पेण : प्रतिनिधी स्वराज्य प्रतिष्ठान पेण पूर्व विभाग आणि जेएसडब्ल्यूू संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वाक्रुळ येथील वाकेश्वर मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 190 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रामशेठ पाटील, वाक्रुळ सरपंच गणेश गायकर, शेतकरी कुकुटपालन …

Read More »

पेणचे राजू पिचिका शांतता कमिटीच्या सदस्यपदी नियुक्त

पेण : प्रतिनिधी जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत पेण येथील उद्योजक राजू पिचिका यांची शांतात कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गणेशोत्सव …

Read More »

खोपोलीत 210 किलो गांजा जप्त

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीतील लौजीजवळ एका झायलो गाडीतून 210 किलो गांजा जप्त करण्यात आला. पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गुरुवारी कारवाई ही रात्री करण्यात आली. जप्त केलेल्या गाजांची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पुण्याकडून मुंबई गोवंडीकडे झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती …

Read More »

खोपोलीतील स्वागत कमानीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

खालापूर : प्रतिनिधी शहराच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आलेली स्वागत कमान मधोमध वाकली असून कमानीवर बसवलेल्या लाद्या व शोभेच्या वस्तू  खिळखिळ्या होऊन जमीनीवर कोसळत आहेत. या कमानीवरील दोन लाद्या गुरुवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता खाली रस्त्यावर कोसळल्या. खोपोली नगर परिषदेने 25 लाख रुपये खर्चून 10 वर्षा पुर्वी खोपोली शहराच्या प्रवेद्वारावर स्वागत …

Read More »

जीवनविद्या मिशनकडून भिवपुरी गावात वृक्षारोपण

कर्जत : बातमीदार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनच्या डोंबिवली शाखेने ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या कर्जत तालुक्यातील भिवपूरी या गावात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगताना ’पर्यावरण हाच नारायण’ असा दिव्य विचार दिला आहे. जीवनविद्या मिशन ही संस्था 2022-2023 हे वर्ष श्री …

Read More »

रायगड रोपवे सहा दिवस बंद राहणार

महाड : प्रतिनिधी शिवप्रेमींना किल्ले रायगडावर केवळ चारच मिनिटांत घेऊन जाणार्‍या रायगड रोप वेची सेवा 5 ते 10 सप्टेंबर या काळात देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड रोप वेचे व्यवस्थापक सतीश माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. किल्ले रायगडवर जाण्यासाठी रोप वेची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान …

Read More »

विराट कोहली झाला अलिबागकर!

झिराड परिसरात खरेदी केला भूखंड; फार्महाऊस बांधणार अलिबाग # प्रतिनिधी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही आठ एकर हवेशीर जागा असून या ठिकाणी तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी (दि. 30) पूर्ण केला. …

Read More »

दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन

पेण ः प्रतिनिधी ढोलताशांच्या गजरात वाजत-गाजत भाविकांच्या घरी गणरायांचे आगमन झाले. त्यानंतर गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. पेणमध्ये विविध ठिकाणी नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. विसर्जनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले …

Read More »