पाली पुलावर सलग दुसर्या दिवशी आले पाणी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल पाली : प्रतिनिधी दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून मंगळवारी दुपारी 12 नंतर पाणी गेले होते. ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री …
Read More »माणगावच्या काळ नदीपुलावर खड्डेच खड्डे
माणगाव : प्रतिनिधी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदीवरील माणगाव येथील पूलावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. माणगावमधील काळ नदीचा पूल मुंबई-गोवा महामार्गावर असून, दिवसांतून हजारो वाहने या पुलावरून ये-जा करीत असतात. पुलावर पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. …
Read More »जिल्ह्यात 11 दिवसांत दोन लाख 87 हजार रोपांची लागवड
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 31 जुलै कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, सहा लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै ते 11 जुलै या 11 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध प्रजातींच्या दोन …
Read More »कर्जत तालुक्याला पुराचा विळखा
उल्हास नदीवरील दहिवली, मालेगाव, पाषाणे पूल पाण्याखाली कर्जत : बातमीदार मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. बुधवार (दि. 13)सकाळपासून नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. नदीवरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाषाणे पुलाला पाणी लागले आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली …
Read More »रायगड जिल्ह्यातील 16 धरणे पूर्ण भरली
अलिबाग : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यात धरणामध्ये पाणीसाठी वाढू लागला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांपैकी 16 धरणे पूर्ण भरली आहेत. जून महिन्यात अनियमित पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. 12 जुलैपर्यंत 918 मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे. जुलै …
Read More »जि. प., पं. स. आरक्षण सोडत तूर्त स्थगित
अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे होणार्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विभागीय कोकण आयुक्त आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत विनंती शासनाला केली होती. या नुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच …
Read More »पिक विमा योजनेत सहभागी व्हावे
मुरूड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ मुरूड : प्रतिनिधी राज्य शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली असून, मुरूड तालुक्यात भारतीय कृषी विमा कंपनीकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेत सहभागीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत असून अधिकाधिक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी …
Read More »मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद
पेण : प्रतिनिधी मनसे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून संपर्क अभियान सुरु केला असून, रविवारी (दि. 10) त्यांचे पेणमध्ये फटाक्याच्या आतषबाजीत मनसे पदाधिकार्यांनी स्वागत केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली होती. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अमित ठाकरे यांनी अभिवादन …
Read More »रोह्यात पावसाचा जोर कायम
रोहे : प्रतिनिधी शहरासह रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्याचे सोमवारी (दि. 11) दिसून आले आहे. सोमवार सकाळपासून अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. वातावरण ढगाळ होते. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसर्या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीला अनकूल पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. …
Read More »माथेरान जुम्मापट्टीजवळ वटवृक्ष कोसळला
कर्जत : प्रतिनिधी माथेरान-नेरळ घाटरस्त्यावर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुमारे शंभर वर्षापूर्वीचे मोठे वडाचे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहेत. धबधब्याच्या आकर्षणामुळे माथेरानमध्ये पर्यटक येत असल्याने नेरळ-माथेरान घाटात वाहतूक वाढली …
Read More »